आर्थिकसेवा क्षेत्रातील रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी पदवीधर तरुणांना आवश्यक कौशल्य आत्मसात करता यावीत या उद्देशाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ तसेच ‘एआयसीटीई’ यांनी बजाज फिनसर्व्ह कंपनीशी दोन सामंजस्य करार केले आहेत.
● ‘बजाज फिनसर्व्ह’ ने 100 तासांचा बँकिंग, वित्तीय क्षेत्र आणि विमा विषयातील एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला आहे.
● या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून 20 हजार उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल.
● हा उपक्रम प्रथम ओडिशा राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार असून तरुण कौशल्य उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बजाज फिनसर्व्ह आणि स्किल इंडिया तर्फे एकत्रित प्रमाणपत्र दिले जाईल.