Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

क्यूएस मानांकनात आयआयटी मुंबई चा पहिल्या 150 संस्थामध्ये प्रवेश | IIT MUMBAI RANKS AMONG TOP 150 INSTITUTES IN QS RANKING

  • Home
  • Current Affairs
  • क्यूएस मानांकनात आयआयटी मुंबई चा पहिल्या 150 संस्थामध्ये प्रवेश | IIT MUMBAI RANKS AMONG TOP 150 INSTITUTES IN QS RANKING

देशातील तंत्र शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या मुंबई आयआयटीने ‘क्यूएस’ जागतिक विद्यापीठ मानांकनामध्ये प्रथमच पहिल्या 150 संस्थांमध्ये स्थान पटकावले आहे.आठ वर्षांपासून बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नंतर ही कामगिरी करणारे आयआयटी मुंबई ही देशातील पहिलीच संस्था ठरली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकनामध्ये मुंबई आयआयटीने 23 स्थानांची झेप घेत 159 वे स्थान पटकावले आहे .2016 या वर्षी147 व्या स्थानी पोहोचलेल्या आयआयएसने पूर्वी हा विक्रम केला होता. मात्र यावर्षी आयआयएसच्या मानंकनात 70 स्थानांची घसरण झाली असून ते 155 व्या स्थानावर वरून 225 व्या स्थानी पोहोचले आहेत.त्याचबरोबर आयआयटी दिल्ली  197, आयआयटी कानपूर 278, आयटी मद्रास 285, व्या स्थानी आहेत.2023 मध्ये ब्रिटनस्थित मानांकन संस्था क्यूएस  ने यावर्षी शाश्वत उपक्रम, रोजगार निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय संशोधन हे तीन नवे निकष मानांकनासाठी वापरले आहेत.रोजगार निर्मितीच्या निकषात मुंबई आयआयटीची कामगिरी इतरांपेक्षा सरस राहिली आहे.‘क्यूएस’ ने जाहीर केलेल्या 500 संस्थांच्या क्रमवारीत भारतातील 45 विद्यापीठे असून आशियातील चीन( 71) आणि जपान (52) नंतर भारताचा तिसरा क्रमांक आहे.यावर्षी दिल्ली विद्यापीठ (407 )आणि अण्णा विद्यापीठाने (427) या यादीमध्ये प्रथमच स्थान पटकावले आहे.

QS World University Ranking:

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स हा जागतिक उच्च शिक्षण विश्लेषक क्वाक्वेरेली सायमंड्स (क्यूएस) द्वारे संकलित केलेल्या तुलनात्मक विद्यापीठ क्रमवारीचा पोर्टफोलिओ आहे.टाइम्स हायर एज्युकेशन ( THE ) मासिकाच्या सहकार्याने त्याची पहिली आणि सर्वात जुनी आवृत्ती टाइम्स हायर एज्युकेशन-क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स म्हणूनझाली, 2004 मध्ये विद्यापीठाच्या कामगिरीबद्दल तुलनात्मक डेटाचा स्वतंत्र स्रोत प्रदान करण्यासाठी उद्घाटन करण्यात आले.2009 मध्ये, दोन संस्थांनी स्वतंत्र युनिव्हर्सिटी रँकिंग, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आणि द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग तयार करण्याचे मार्ग वेगळे केले.

सुरवात:- 2004

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *