- जगातील टॉप युनिव्हर्सिटीची ताजा रॅंकींग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025 ( QS World University rankings 2025 ) जारी करण्यात आली आहे.
- यात भारतातील शैक्षणिक संस्थांनी देखील नंबर पटकावला आहे. क्युएस वर्ल्ड रॅंकींग 2025 च्या यादीत आयआयटी मुंबई(118वे स्थान) आणि आयआयटी दिल्ली(150 वे स्थान) यांनी टॉप 150 शैक्षणिक युनिव्हर्सिटीमध्ये स्थान पटकावले आहे.
- दोन भारतीय शैक्षणिक संस्थांनी रॅंकींग गेल्यावर्षीपेक्षा चांगली झाली आहे.पहिल्या एक हजार संस्थांमध्ये महाराष्ट्रातील चार संस्थांनी स्थान मिळवले आहे.
- आयआयटी मुंबई
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- सिम्बयोसिस विद्यापीठ
- मुंबई विद्यापीठ
- अमेरिकेतील केम्ब्रिजच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (MIT) या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.
- तर दुसऱ्या स्थानी लंडनचे इम्पिरियल कॉलेज, तिसऱ्या स्थानी ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे.
- निकष: नियोक्ता प्रतिष्ठा, शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, रोजगार परिणाम,शाश्वतता, आंतरराष्ट्रीय संशोधन अशा निकषांवर उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले.