जगभरातील 112 देशांतील सौंदर्यवतींनी हजेरी लावलेल्या ‘मिस वर्ल्ड 2024’ स्पर्धेत चेक रिपब्लिकच्या क्रिस्तिना पिझकोव्हा हिच्या शिरपेचात जेतेपदाचा मुकुट खोवला गेला. ही स्पर्धा मुंबईत पार पडली.
अधिक माहिती
• 71 व्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत लेबनॉनच्या यास्मिना झेतौन हिने द्वितीय स्थान पटकावले.
• तब्बल 28 वर्षांनी भारतात झालेल्या या स्पर्धेत भारताच्या सिन्नी शेट्टी हिने भारताचे प्रतिनिधित्व केले.
• ‘मिस इंडिया वर्ल्ड 2022’चा किताब पटकावणाऱ्या सिन्नीने ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतही पहिल्या आठ जणींमध्ये स्थान मिळवले होते.
मिस वर्ल्ड स्पर्धेविषयी…
• मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे.
• लंडन येथे मुख्यालय असलेली ही स्पर्धा 1951 साली युनायटेड किंग्डममध्ये स्थापन करण्यात आली.
• मिस युनिव्हर्स व मिस ग्रँड इंटरनेशनलसोबत मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मानली जाते.
• ह्या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धक महिलांना आपापल्या देशामधील सौंदर्यस्पर्धांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे.
• भारतामधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा खिताब जिंकणाऱ्या महिलेला मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडले जाते.
• आजवर 6 भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली असून ह्याबाबतीत भारताचा व्हेनेझुएलाखालोखाल जगात दुसरा क्रमांक लागतो.
मिस वर्ल्ड विजेत्या भारतीय महिला
• रिटा फारीया (1966)
• ऐश्वर्या राय (1994)
• डायना हेडन (1997)
• युक्ता मुखी (1999)
• प्रियांका चोप्रा (2000)
• मनुषी छिल्लर (2017)