● भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ‘अॅक्सिऑम-४’ मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर आज उड्डाण करतील.
● मोहिमेचे सारथ्य ग्रुप कॅप्टन शुक्ला करणार आहेत.
● १८८४ साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले ‘गगनवीर’ राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारे शुक्ला हे दुसरेच भारतीय असतील.
● ‘नासा’ आणि ‘इस्रो’च्या सहकार्याने ‘अॅक्सिऑम-४’ मोहीम होत आहे.
● फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून ‘स्पेस-एक्स’चे प्रक्षेपणयान भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता उड्डाण करेल.
● शुक्ला हे या मोहिमेचे सारथ्यही करणार असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात त्यांचे पंधरा दिवस वास्तव्य असेल या काळात ते शून्य गुरुत्वाकर्षणात काही प्रयोगही करणार आहेत
‘अॅक्सिऑम-४’चे अंतराळवीर
● ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, भारत
● (इस्रो)स्लावोझ उइनान्स्की, पोलंड, (युरोपीय अवकाश संस्था)
● टिबर कापू, हंगेरी
● पेगी व्हाइटसन, अमेरिका