- इंग्लंडमधील बाथ शहरात पार पडलेल्या 65 व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये (आयएमओ 2024) सहा विद्यार्थ्यांच्या भारतीय संघाने 4 सुवर्ण व 1 रौप्य पदक आणि एका विशेष पारितोषिकाची कमाई केली.
- आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये 1989 मध्ये पदार्पण केल्यानंतर भारतीय संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी असून भारताने यावर्षी 108 देशांमधून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
- यापूर्वी ‘आयएमओ’ 1998 आणि 2001 मध्ये भारत सातव्या क्रमांकावर होता.
- इंग्लंडमधील बाथ शहरात 11 ते 22 जुलै या कालावधीत 65 व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते.
- या स्पर्धेत एकूण 108 देशातील 609 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये 528 विद्यार्थी आणि 81 विद्यार्थिनींचा समावेश होता.
- सहा विद्यार्थ्यांच्या भारतीय संघातील पुण्यातील आदित्य मांगुडी वेंकट गणेश (इयत्ता अकरावी), गुवाहाटीतील आनंदा भादुरी (इयत्ता बारावी), नोएडातील कणव तलवार (इयत्ता दहावी) आणि मुंबईतील रुशील माथुर (इयत्ता बारावी) यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली.
- दिल्लीतील अर्जुन गुप्ता (इयत्ता बारावी) याने रौप्य पदक पटकावले, तर पुण्यातील सिद्धार्थ चोप्रा (इयत्ता बारावी) याने विशेष पारितोषिक प्राप्त केले.
- या स्पर्धेच्या अंतिम जागतिक क्रमवारीत अमेरिकेने 192 गुणांची कमाई करीत प्रथम स्थान, चीन आणि दक्षिण कोरिया यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.
- तर भारतीय संघाने 167 गुणांची कमाई करीत चौथ्या स्थान पटकावले.