आरोग्य विभागाने राज्यातील बालमृत्यू आणि मुदतपूर्व प्रसूती रोखण्यासाठी पावले उचलली असून, यासाठी ‘वात्सल्य’ योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत प्रसूतिपश्चात माता आणि दोन वर्षांपर्यंतची बालके यांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
गर्भवती ते शिशू दोन वर्षांचे होईपर्यंत आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा आणि तपासण्या करण्यात येणार आहे.
नवजात बालकांवर उपचार
● मुदतपूर्व प्रसूती होणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, जन्मतः आजारी असणे किंवा व्यंग असणे, प्रसूती काळात गर्भवतीला मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार होण्याचे प्रमाण काही वर्षांत वाढले आहे.
● आरोग्य विभागाच्या राज्यातील रुग्णालयांत गेल्या दोन वर्षांत कमी वजनाच्या (1500 ग्रॅमपेक्षा कमी) असलेल्या 3 हजार 742 नवजात बालकांवर उपचार करण्यात आले आहेत.
● या योजनेद्वारे बालकांच्या वाढीचे एक हजार दिवसांपर्यंत मूल्यमापन करण्यात येणार आहे.
योजनेतील महत्त्वाच्या बाबी
● गर्भधारणेपूर्वी रक्तक्षय प्रतिबंध उपचार करणे.
● प्रसूतीपूर्वी लोहयुक्त गोळ्या देणे.
● किशोरवयीन मुलींना गरोदर होण्यापासून रोखणे.
● दोन गरोदरपणातील अंतर जास्त ठेवण्यासाठी समुपोदेशन करणे.
● गर्भधारणेपूर्वी तपासण्या करणे.
● अतिजोखमीच्या आजारांचे निदान करून उपचार करणे.
● घरोघरी जाऊन भेटी देणे.