गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस आणि एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) यांच्यात एक करार झाला आहे.
या करारानुसार, एनपीसीआयने विकसित केलेल्या यूपीआय पेमेंट प्रणालीची व्याप्ती वाढवून ती जागतिक स्तरावर नेण्यासाठी गुगल आपल्या गुगल-पे या पेमेंट अॅपच्या माध्यमातून सहकार्य करील. यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
अधिक माहिती
● यामुळे भारतीय पर्यटकांना प्रवाशांना दुसऱ्या देशात गुगल-पे अर्थात जी-पेच्या साह्याने यूपीआय मंचाच्या साह्याने पेमेंट करता येतील.
● या भारतीय पर्यटकांना रोकड बाळगण्याची गरज यामुळे उरणार नाही.
● या सामंजस्य करारामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत.
○ यूपीआय पेमेंट्सची व्याप्ती वाढवून तिचा वापर विदेशात जाणाऱ्या भारतीयांना करता येणे व त्यामुळे या भारतीयांना विदेशात अदायगीच्या वेळी होईल.
○ करारांतर्गत दुसऱ्या देशात यूपीआय-लाइक डिजिटल पेमेंट सिस्टीम निर्माण करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे.
○ विदेशातून भारतात पैसे पाठवण्यासाठी यूपीआय मंचाचा वापर करता येणे.
● या करारान्वये विदेशातील पेमेंट व्यवहार सुलभ होतील.