प्रसिद्ध उर्दू कवी, गीतकार गुलजार आणि संस्कृतचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 2024 या वर्षाचा 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. सन 1944 पासून देण्यात येणारा ज्ञानपीठ पुरस्कार दर वर्षी भारतीय साहित्यातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा; तर उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा देण्यात येत आहे. वाग्देवीची प्रतिमा, 21 लाख रुपये, आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. निवड समितीत माधव कौशिक, दामोदर मावजो, प्रा. सुरंजन दास, प्रा. पुरुषोत्तम बिलमाले, प्रफुल्ल शिलेदार, प्रा. हरीश त्रिवेदी, प्रभा वर्मा, डॉ. जानकीप्रसाद शर्मा, ए. कृष्णा राव आणि ज्ञानपीठ चे संचालक मधुसूदन आनंद यांचा समावेश होता.
गीतकार गुलजार
● जन्म: 18 ऑगस्ट, 1934, देना, जि. झेलम
● मूळ नाव: संपूर्ण सिंह कालरा
● हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिजात गीतकार गुलजार हे सर्वोत्तम आणि दर्जेदार उर्दू कवी म्हणून ओळखले जातात.
● यापूर्वी त्यांना 2002 मध्ये उर्दुसाठी साहित्य अकादमी, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
● गुलजार यांच्या ‘चांद पुखराज का’, ‘रात पश्चिने’ आणि ‘पंद्रह पांच पचहत्तर’ या साहित्याचा उल्लेख करता येईल.
● 2009 मध्ये ऑस्कर पुरस्कार आणि 2010 मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळवलेले ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ – हे गाणे आणि ‘माचिस’ (1996), ‘ओमकारा’ (2006), ‘दिल से…’ (1998) आणि ‘गुरू’ (2007) या समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटांतील गुलजार यांनी लिहिलेली गाणी विशेष गाजली. गुलजार यांनी ‘कोशिश’ (1972), ‘परिचय’ (1972), ‘मौसम’ (1975), ‘इजाजत’ (1977) या सिनेमांचे आणि ‘मिर्झा गालिब’ (1988)या दूरचित्रवाणीवरील मालिकेचे दिग्दर्शन केले.
● गुलजार यांनी ‘त्रिवेणी’ या तीन ओळींचा नवा काव्यप्रकार उर्दूमध्ये आणला. त्यांनी बालकवितेतही योगदान दिले आहे.
● 1969 मध्ये विमल रॉय दिग्दर्शित ‘बंदिनी’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये गीतकार म्हणून प्रवेश केला.
● त्यांना खरी ओळख ‘खामोशी’चित्रपटातील गीताने दिली. इथूनच गुलजार यांचा हिंदी चित्रपटाचा प्रवास सुरू झाला तो आजतागायत कायम आहे.
पंडित रामभद्राचार्य
● जन्म: 14 जानेवारी 1950, जैनपूर , उत्तर प्रदेश
● मूळ नाव : गिरिधर मिश्र
● चित्रकूट येथील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख. ते नामांकित हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षक.
● शंभराहून अधिक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.
● जन्मानंतर दोन महिन्यांनीच दृष्टी गमावणारे रामभद्राचार्य हे सर्वोत्तम शिक्षक असण्याबरोबरच संस्कृत भाषेचे विद्वानही. त्यांना 22 भाषेचे ज्ञान आहे.
● रामभद्राचार्य यांना 2015 मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविले. पंडित रामभद्र यांनी श्रीभार्गवराघवीयम, अष्टावक्र, आझादचंद्रोखरचरितम, लघुरघुवरम, सरयूलहरी, भृंगदूतम, कुब्जापत्रम याचा समावेश आहे.
● 1988 या वर्षी त्यांना जगद्गुरू ही उपाधी त्यांना प्राप्त झाली. रामभद्राचार्य लिहूवाचू शकत नाहीत कारण ब्रेल लिपीचा उपयोग त्यांनी कधी केला नाही. ते ऐकून ऐकून शिकले. वयाच्या पाचव्या वर्षी संपूर्ण गीता पाठ केली होती.
● 1967 मध्ये त्यांनी जौनपूर जिल्ह्यातील सुजनगंज येथे असलेल्या ‘आदर्श गौरीशंकर संस्कृत कॉलेजा ‘त प्रवेश घेतला.
● 1983 मध्ये रामानंद संप्रदायाचे ते अनुयायी झाले . तेव्हापासून ते रामभद्रदास म्हणून ओळखले जाऊ लागले.
● 1987 मध्ये रामभद्रदासांनी चित्रकूटमध्ये ‘तुळसीपीठ’ ही एक धार्मिक आणि समाजसेवी संस्था स्थापन केली.
● 1988 मध्ये काशी विद्वत् परिषदेने त्यांची तुळसीपीठ आसनस्थ जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणून निवड केली.
ज्ञानपीठ पुरस्कार
● साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च दोन पुरस्कारांपैकी (साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार) एक.
● भारतीय भाषांमधील साहित्यामध्ये आजीवन योगदान दिल्याबद्दल भारतीय नागरिकास ‘भारतीय ज्ञानपीठ’ या ट्रस्टतर्फे (‘दि टाइम्स ऑफ इंडिया’ च्या जैन कुटुंबाने स्थापन केलेली ही ट्रस्ट आहे.) हा पुरस्कार दिला जातो.
● स्थापना : 1961
● पहिला पुरस्कार : 1965 साली गोविंद शंकर कुरूप यांना ‘उडाक्क्रुझल’ या मल्याळम् कविता संग्रहासाठी.
● पुरस्कार स्वरूप : 11 लाख रुपये मानपत्र व सरस्वतीदेवीची कांस्यमूर्ती.
● 1982 सालापूर्वी हा पुरस्कार लेखकाच्या कोणत्याही एका साहित्यकृतीसाठी दिला जात होता.
● मात्र 1982 नंतर तो लेखकाच्या साहित्यक्षेत्रातील आजीवन योगदानासाठी दिला जात आहे.
● आतापर्यंत हा पुरस्कार सर्वात जास्त वेळा हिंदी भाषेसाठी देण्यात आला आहे.
मराठी भाषेतील ज्ञानपीठ विजेते
● वि. स. खांडेकर (ययाती, 1971),
● वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (विशाखा, 1987),
● विंदा करंदीकर (अष्ट दर्शने, 2003),
● भालचंद्र नेमाडे (हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ, 2014)