नव्या फौजदारी विधेयकावर गृहविषयक संसदीय स्थायी समितीमध्ये सखोल अभ्यास केला जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार पी. चिदंबरम यांची अत्यंत महत्त्वाच्या समितीवर नियुक्त करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय पुरावा कायद्याची जागा भारतीय शिक्षा संहिता तर फौजदारी प्रक्रिया संहितेऐवजी नागरिक सुरक्षा संहिता असे तीन कायदे केले जाणार आहेत. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार पी. भट्टाचार्य निवृत्त झाल्यामुळे गृहविषयक स्थायी समितीतील जागा रिक्त झाली होती. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिर रंजन चौधरी व राज्यसभेचे खासदार दिग्विविजयसिंह या समितीचे सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजलाल यांच्याकडे आहे.


