फ्रान्स पंतप्रधान एलिझाबेथ बोर्ण यांनी राजीनामा दिल्यानंतर फ्रान्सच्या पंतप्रधानपदी गॅब्रियल अटल यांची नियुक्ती करण्यात आली.
34 वर्षीय अटल हे फ्रान्सचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.याआधी फ्रान्समध्ये लॉरेंट फॅबियस वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते.
अधिक माहिती
● अटल हे समलिंगी असून फ्रान्सच्या पंतप्रधानपदावर येणारे ते पहिलेच समलिंगी असतील.
● याआधी अटल यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
● विदेशी नागरिकांना देशाबाहेर हाकलण्याचा अधिकार देण्याच्या विधेयकावरून फ्रान्समध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे .
● अध्यक्ष ईमेन्युअल मॅक्रोन यांचा या विधेयकाला पाठिंबा दिला असून त्यातूनच बोर्ण यांनी राजीनामा दिला.