Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

गोगलगायीच्या नवीन प्रजातीचा शोध Discovery of a new species of snail

Discovery of a new species of snail

● कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम घाटात असलेल्या तीन देवरायांमधून गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे.

● ही प्रजाती देवराईमध्ये आढळल्याने या प्रजातीचे नामकरण ‘डायक्रॅक्स देवराईवासी’ असे करण्यात आले. ही प्रजाती आकाराने 5 मिलिमीटरपेक्षा लहान आहे.

● दहिवडी महाविद्यालयातील डॉ. अमृत भोसले, ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील डॉ. ओमकार यादव यांचा या संशोधनात सहभाग आहे.

● गोगलगायीच्या प्रजातीचे तपशील असलेला शोधनिबंध ‘जर्नल ऑफ कॉन्कोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला.

● सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील आंबा या गावातील आंबेश्वर देवराई, पाटगावजवळील श्री स्वयंभू मंदिर देवराई आणि गगनबावड्याजवळील तळये गावातील गंगोबा देवराई येथील पालापाचोळ्यांत ही प्रजाती आढळली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *