- गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारताने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
- एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा7 टक्के आहे.
- भारतानंतर बांगलादेश, चीन, म्यानमारचा क्रमांक लागतो.
- संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि शेती संघटनेने प्रसिद्ध केलेल्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज् अँड अॅक्वाकल्चर 2024’ या अहवालानुसार, 2022 मध्ये 1 कोटी 13 लाख 21 हजार टन गोड्या पाण्यातील मत्स्य आणि जलचर प्राण्यांचे उत्पादन झाले.
- त्यात भारताचा वाटा7 टक्के इतका सर्वाधिक आहे.
- 2022 मध्ये देशात 18 लाख 90 हजार टन मत्स्य आणि जलचर प्राण्यांचे उत्पादन झाले आहे.
- भारतानंतर बांगलादेशचा दुसरा क्रमांक असून, 11.7 टक्क्यांसह 13 लाख 22 हजार टन उत्पादन होते.
- चीन तिसऱ्या क्रमांकावर असून, 10.3 टक्क्यांसह 11 लाख 66 हजार टन उत्पादन होते.
- जागतिक एकूण मत्स्य आणि जलचर प्राण्यांच्या उत्पादनात गोड्या पाण्यातील उत्पादनांचा वाटा 12 टक्के आहे.
- गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात आशियाई देश आघाडीवर आहेत.
- भारत, बांगलादेश, चीन आणि म्यानमार या देशांचा एकूण गोड्या पाण्यातील मत्स्य आणि जलचर उत्पादनात दोन तृतीयांश इतका वाटा आहे.