Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

गोपाळ चांदोरकर यांचे निधन Gopal Chandorkar passes away

Gopal Chandorkar passes away

● रायगडावरील ऐतिहासिक स्थापत्याचे प्रसिद्धअभ्यासक, लेखक, जुन्या पिढीतील ज्येष्ठ स्थापत्यविशारद गोपाळ मुकुंद चांदोरकर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
● छत्रपती अभ्यास शिवाजी महाराजांच्या दुर्गांचा, त्यातही विशेष करून राजधानी रायगडावरील वास्तूंचा स्थापत्यशास्त्राच्या अंगाने गेली पन्नासहून अधिक वर्ष ते अभ्यास करीत होते.
● रायगडावरील प्रत्येक वास्तूची स्थापत्य वैशिष्ट्ये, मोजमापे, आरेखन, नकाशे, संकल्पचित्र तयार करून त्यांनी रायगडावरील वास्तू अभ्यासाची नव्याने मांडणी केली होती.
● या संशोधनाने गडाला नवी ओळख प्राप्त झाली.
● या संशोधनावर आधारित त्यांनी ‘श्रीमद् रायगिरौ’ या ग्रंथाचे लेखन केले.
● या शिवाय ‘रायगड बालेकिल्ला’, ‘चला पाहू या रायगड’, ‘, ‘वैभव रायगडाचे’ आदी पुस्तकांचेही त्यांनी लेखन केले. त्यांच्या या कार्याबद्दल भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
● याशिवाय संस्कार भारती, विदर्भप्रांत नटराजपूजन गुरुवर्य आदी पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *