- भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची निवड करण्यात आली.
- गंभीर आता डिसेंबर 2027 पर्यंत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर कायम राहणार असून टी-20 एकदिवसीय व कसोटी अशा तिन्ही प्रकारात ते खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.
- 27 जुलैला सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापासून गंभीर हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
- खेळाडू म्हणून गौतम गंभीरणे भारताच्या 2007 च्या टी-ट्वेंटी आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच कर्णाधार म्हणूनही त्यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्येही छाप पाडली .
- त्यांच्या नेतृत्वाखाली कोलकत्ता ने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले .
- 2024 मध्ये झालेल्या आयपीएल मध्ये ही कोलकत्ता या संघाचे मेंटॉर म्हणून काम पाहिलेले गंभीर कोलकत्ता च्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मुख्य भूमिका निभावली होती.
या महत्त्वाच्या स्पर्धा गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील..
- 2025 चॅम्पियन करंडक
- 2025 जागतिक कसोटी अंतिम सामना
- 2026 टी- 20 विश्वचषक स्पर्धा
- 2027 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा