चंद्रावर खासगी यानाचे अवतरण
- अमेरिकेतील ‘नासा’च्या यंत्रणांचा वापर करून ‘ब्लू घोस्ट’ या खासगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस् अवतरण केले.
- ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ कंपनीचे हे अवकाशयान असून चंद्रावर यानाचे अवतरण करणारी ही पहिलीच खासगी कंपनी ठरली.
- ‘ब्लू घोस्ट हे चंद्रावर उतरणारे पहिले खासगी आणि केवळ दुसरे व्यावसायिक यान आहे. अवकाश क्षेत्रामध्ये व्यावसायिक शोधामध्ये मोठी झेप म्हणून या प्रयोगाकडे पाहिले जात आहे.
- चंद्रावर उतरल्यानंतर ‘ब्लू घोस्ट’ने चंद्राच्या पृष्ठभागावरून छायाचित्रे पाठविण्यास सुरुवात केली.
- पहिले छायाचित्र सेल्फीसदृश असून, दुसरे छायाचित्र पृथ्वीचे आहे.
- फ्लोरिडा येथून 15 जानेवारीला ‘ब्लू घोस्टचे प्रक्षेपण करण्यात आले. ते चंद्रावरील कक्षेतून स्वयंचलित तंत्राद्वारे ते चंद्रावर यशस्वीपणे (सॉफ्ट लँडिंग) उतरले.
- लँडर यशस्वीपणे चंद्रावर उतरल्याची ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’च्या टेक्सास येथील नियंत्रक कक्षाकडून पुष्टी करण्यात आली.
- ‘ब्लू घोस्ट’च्या प्रक्षेपणासाठी1 कोटी डॉलर तर, यानातील तंत्रज्ञानासाठी 4.4 कोटी डॉलर खर्च आला.
- चंद्रावर यशस्वीपणे अवकाशयान उतरवणारी ‘फायरफ्लाय’ ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे.
- पृथ्वीवरून दिसणारे चंद्रावरील प्रचंड मोठ्या विवरांचा शोध घेणे हा या मोहिमेचा हेतू आहे.
- नासा आणि खासगी कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमांपैकी अगदी अलीकडील उपक्रम म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे