Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

चांद्रयान-5 मोहिमेला केंद्राची मंजुरी Chandrayaan-5 mission approved by Centre.

Chandrayaan-5 mission approved by Centre.

● केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला मंजुरी दिल्याची माहिती आज इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली.
● या मोहिमेच्या मदतीतून इस्रो चंद्राचा अभ्यास करणार आहे.
● चांद्रयान-3 अभियानात 25 किलोचा रोव्हर प्रज्ञानला चंद्रावर पाठविण्यात आलेला असताना चांद्रयान-5 मोहिमेत अडीचशे किलो वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्टभागावर उतरेल.
● चांद्रयान-1 ने 2008 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर रासायनिक पदार्थ, खनिजांचा शोध घेतला होता आणि त्याने चंद्रावर भू-मोजणी केली होती.
● चांद्रयान- 2 मोहिमेने ठरविलेल्या ध्येयाचे काम पूर्ण केले.
● चांद्रयान-3 मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे व रोव्हरकडून चंद्राच्या पृष्ठभागावरची माहिती गोळा केली जात आहे.
● ‘चांद्रयान-1’ :- 22 ऑक्टोबर 2008
● ‘चांद्रयान-2’ :- 22 जुलै 2019
● ‘चांद्रयान-3’ :- 14 जुलै 2023
● ‘चांद्रयान-4’ :- 2027 मध्ये प्रस्तावित
● भारताच्या ‘चांद्रयान’ मोहिमांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जातो.
● ‘चांद्रयान-4’ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्रावरून विविध नमुने गोळा करण्याचे असून, ती सन 2027 मध्ये अपेक्षित आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *