Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

चांद्रयान 5 – लुपेक्स मोहीम शोधणार चंद्रावरील पाणी Chandrayaan 5 – Lupex mission will search for water on the moon

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • May 2025
  • चांद्रयान 5 – लुपेक्स मोहीम शोधणार चंद्रावरील पाणी Chandrayaan 5 – Lupex mission will search for water on the moon
Chandrayaan 5 - Lupex mission will search for water on the moon

● भारत आणि जपानची चांद्रयान 5- लुनार पोलार एक्स्प्लोरेशन (लुपेक्स) ही संयुक्त मोहीम 2028 – 29 मध्ये जपानी रॉकेटच्या साह्याने प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
● चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पाण्याचा थेट शोध घेऊन भविष्यातील मोहिमांसाठी हायड्रोजन स्रोताची चाचपणी करण्याचे काम ही मोहीम करणार आहे.
● भारताची आगामी ‘चांद्रयान 4 ‘ ही मोहीम चंद्रावरील दगड- मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी आखण्यात आली आहे.
● पाठोपाठ जपानच्या सहकार्याने ‘चांद्रयान 5’ ही मोहीमदेखील पार पडणार आहे.
● नुकतीच मार्चमध्ये या मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, मोहिमेचे अंतिम स्वरूप निश्चित करण्यासाठी येत्या आठवड्यात ‘इस्रो’ आणि ‘जॅक्सा’ यांची बैठक बेंगळुरू येथे होणार आहे.
● ‘चांद्रयान 5- लुपेक्स ही भारत आणि जपानची संयुक्त मोहीम असेल.
● मोहिमेचे प्रक्षेपण जपानच्या ‘एच 3′ रॉकेटच्या साह्याने करण्यात येईल.
● मोहिमेत भारताचे लँडर; तर जपानच्या रोव्हरचा समावेश असेल.
● लँडरप्रमाणेच जपानच्या रोव्हरवरदेखील भारताची वैज्ञानिक उपकरणे बसविण्यात येईल.
● या मोहिमेत युरोपची अवकाश संशोधन संस्था- ईसा आणि अमेरिकी अवकाश संशोधन संस्था- नासा यांच्या उपकरणांचाही समावेश असेल.
● 2028- 29 मध्ये ही मोहीम प्रक्षेपित करण्यात येणार असून, पूर्वीच्या मोहिमांच्या तुलनेत या मोहिमेचा कालावधी बराच जास्त असेल.’

अशा प्रकारे चंद्रावरील पाण्याचा शोध घेतला जाईल

● जपानच्या रोव्हरवर बसवलेल्या भारताच्या ग्राऊंड पेनिट्रेटिन्ना रडारच्या साह्याने तेथील जमिनीत दीड मीटर खोलीपर्यंतच्या पाण्याचा वेध घेतला जाईल.
● ज्या भागात पाण्याचे प्रमाण जास्त आढळेल, तेथील मातीचे दोन नमुने जमा केले जातील.
● जपानी आणि भारतीय उपकरणांच्या साह्याने त्यांचे विश्लेषण करण्यात येईल.
● भारतीय उपकरणांमध्ये माती 200 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापवण्यात येईल.
● या वेळी मातीतून मुक्त होणारे वायू, वाफ यांच्या विश्लेषणातून मातीतील पाण्याचे प्रमाण आणि दर्जा शोधला जाईल. त्यातून हायड्रोजनच्या उपलब्धतेचाही अंदाज येऊ शकेल.
● ही मोहिम चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील टेकडीवर उतरवण्यात येणार असून, मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात रोव्हरला कायमस्वरूपी अंधारात असलेल्या भागात उतरवून तेथील पाण्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *