- पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने गोळा करण्यासाठी चीनने पाठविलेले ‘चँग ई-6’ हे चांद्रयान 25 जून रोजी पृथ्वीवर सुखरूप परतले.
- चीनच्या अवकाश संशोधनातील ही महत्त्वाची मोहीम यशस्वी झाली आहे.
- चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे.
- तसेच मानवाने सुरू केलेल्या चंद्राच्या संशोधनातील हा पहिलाच प्रयत्न होता.
- चीनच्या चंद्रदेवतेच्या नावावर असलेल्या ‘चँग ई-6’या मोहिमेअंतर्गत दक्षिण चीनमधील हैनान प्रांतातून यानाचे प्रक्षेपण 3 मे रोजी झाले होते.
- पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरले होते.
- सुमारे 53 दिवसांनंतर यान उत्तर मंगोलियातील वाळवंटात उतरले.
- यानाने चंद्रावरून विशेषतः दक्षिण ध्रुवावरील एटकेन खोऱ्यातील अपोलो विवरातून दोन किलो माती पृथ्वीवर आणली आहे.
- चंद्राचा भूवैज्ञानिक इतिहास आणि पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या आणि दिसणाऱ्या बाजूंमधील तफावतींवर यामुळे प्रकाश टाकला जाईल, अशी अपेक्षा आहे.
तंत्रज्ञानाचा पराक्रम
- “चीनने मिळविलेले हे मोठे यश आहे. चंद्रावरून मातीचे नमुने गोळा करणे हे अवघड काम आहे.
- चंद्राच्या न दिसणाऱ्या भागात, जेथे संपर्क प्रस्थापित होणे कठीण असते अशा भागातून नमुने आणण्याचे शिवधनुष्य चीनने पेलले आहे.
- याआधी अन्य कोणत्याही अवकाश संशोधन संस्थेने अशी मोहीम हाती घेतली नव्हती. हा तर तंत्रज्ञानाचा पराक्रमच आहे,” असे सांगत ब्रिटनमधील लिसेस्टर विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्र आणि अंतराळ विज्ञानाचे प्राध्यापक मार्टिन बारस्टो यांनी चीनचे कौतुक केले.
मोहिमेचे महत्त्व
- अब्जावधी वर्षांपूर्वी चंद्र आणि इतर ग्रहांच्या निर्मिती कशी झाली, याची माहिती मिळू शकेल.
- ‘चँग ई-6’चे यश हे चीनच्या महत्त्वाकांक्षी चांद्र संशोधन मोहिमेतील मैलाचा दगड
- चंद्राच्या न दिसणाऱ्या भागात रोव्हर उतरविण्याची कामगिरी आधीच केल्याने आता 2030 पूर्वी चिनी अंतराळवीरांचे पाऊल चंद्राच्या पृष्ठभागावर पडण्याची शक्यता
‘चँग-6’चे कार्य
- यानातून रोव्हर बाहेर आल्यानंतर दोन दिवस दगड-माती गोळा केली
- चंद्रावरील सर्वांत जुन्या आणि सर्वांत मोठ्या विवरांपैकी एक असलेल्या आणि 1600 मैल रुंदीच्या दक्षिण ध्रुव-एटकेन (एसपीए) विवरातून खोदकाम
- माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी ड्रिल यंत्र आणि रोबोटिक हाताचा वापर
- डिल यंत्र आणि रोबोटिक हातही यानातून पृथ्वीवर परत आणले