देशाची राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आता छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन स्थापन करण्यास राज्य शासनाने संमती दिली आहे. या केंद्रासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला असून, हा निधी सांस्कृतिक विभागाकडून दिला जाणार आहे.
अधिक माहिती
• या केंद्रामध्ये अंतर्गत सुरक्षा, गनिमी कावा, किल्ल्यांच्या तटबंदी संबंधातील रणनीती आणि मराठा इतिहास या विषयांचा समावेश असेल.
• त्याचबरोबर केंद्रामध्ये मराठी भाषेतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच मराठा साम्राज्याची सैन्यव्यूह रचना व किल्ले आणि तटबंदी यामधील पीएच. डी. करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.