- जागतिक सर्वोच्च शाळा पुरस्कारांसाठी नामांकित झालेल्या जगभरातील 10 शाळांपैकी 5 शाळा भारतातील निवडण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन शाळा महाराष्ट्रातील आहेत. तर, उर्वरित एक शाळा दिल्लीची असून एक अहमदाबादची आहे.
- समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
- युकेतील T4 एज्युकेशनकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते.
- यंदा Accenture, American Express, Yayasan Hasanah आणि Lemann Foundation यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
- Community Collaboration (समुदाय सहयोग), Environmental Action (पर्यावरणीय कृती), Innovation (नावीन्य), Overcoming Adversity (प्रतिकूलतेवर मात करणे) आणि Supporting Healthy Lives (निरोगी जीवनाचे समर्थन करणे) या श्रेणीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
- 2022 पासून हा पुरस्कार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात.
- या पुरस्कारासाठी युएसडी 250000 रुपयांच्या निधीची तरतूद आहे. टॉप फाईव्ह विजेत्यांना यापैकी युएसडी 50000 रक्कम प्रत्येकाला देण्यात येणार आहे.
- भारतातील ‘या’ शाळांना मिळाले नामांकन
- Community Collaboration या श्रेणीत भारताच्या ओबेरॉय इंटरनॅशनल शाळेचा समावेश आहे. ही मुंबईतील शाळा असून स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आहे.
- Overcoming Advertisy या श्रेणीमध्ये स्नेहलया इंग्रजी माध्यम या महाराष्ट्राच्या शाळेचा समावेश आहे. ही अहमदनगर येथील एक धर्मादाय शाळा असून या शाळेने एड्सग्रस्त पालकांच्या मुलांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवला आहे.
- मुंबईतील शिंदेवाडी पब्लिक स्कूल (आकांक्षा फाऊंडेशन) या शाळेलाही Supporting Healthy Lives या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. लॉकडाऊनंतर या शाळेने रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आणि कुपोषित बालकांसाठी काम केले.
- दिल्लीतील नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय एफ ब्लॉक, दिलशाद कॉलनी ही सरकारी शाळाही या स्पर्धेसाठी Community Collaboration या श्रेणीसाठी नामांकित झाली आहे.
- गुजरातमधील अहमदाबाद येथील रिवरसाईड शाळेलाही या स्पर्धेसाठी इनोवेशन श्रेणीत नामांकन मिळालं आहे. या शाळेने I Can ही सुरू केलेली योजना जगभर प्रसिद्ध झाली आहे.