● जपानने हवामान बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
● जपानच्या नैऋत्येकडील तानेगाशिमा अंतराळ केंद्रातून ‘एच-2 ए’ रॉकेटने गोसॅट-जीडब्ल्यू उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
● 16 मिनिटांनी हा उपग्रह नियोजित कक्षेत सोडण्यात आला.
● हे प्रक्षेपण यापूर्वीच करण्यात येणार होते. मात्र, काही दिवसांपूर्वी या रॉकेटच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रक्षेपणाला उशीर झाला.