महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पहिले ‘कर्णरोपण‘
- जन्मजात कर्णबधिर मुलांवरील कर्णरोपण (कॉक्लिअर इम्प्लांट) शस्त्रक्रिया मागील वर्षभरापासून थांबली होती. परंतु, आता या शस्त्रक्रियेचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आल्याने राज्यातील पहिली शस्त्रक्रिया नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) झाली.
- मेडिकल आणि मेयो या दोन्हीसह देशातील निवडक रुग्णालयात 2018 पासून केंद्राच्या एडीआयपी योजनेतून कर्णरोपण शस्त्रक्रिया व्हायची. परंतु, मागील वर्षभरापासून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक महागडे यंत्र मिळत नव्हते. त्यामुळे शस्त्रक्रिया थांबल्या होत्या.
- परंतु, राज्य शासनाने नुकतेच या शस्त्रक्रियेचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला.
- नागपुरातील मेडिकल प्रशासनाने आचारसंहितेपूर्वी या योजनेतील रुग्णांसाठी आवश्यक कर्णयंत्र खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली व अखेर या योजनेतून दोन वर्षीय बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
ऑस्ट्रेलियात भारताच्या चौथ्या वाणिज्य कचेरीचे उदघाटन
- परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे भारताच्या नव्या वाणिज्य कचेरीचे उद्घाटन केले.
- यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियातील व्यापाराला आणखी वेग येईल.
- सिडने, मेलबर्न आणि पर्थ या शहरांनंतर ऑस्ट्रेलियामधील ही भारताची चौथी वाणिज्य कचेरी आहे.
जम्मू–काश्मीर विधानसभा अध्यक्षपदी राथेर यांची निवड
- नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू- काश्मीरच्या चरार-ए-शरिफ येथून सात वेळा आमदारकी भूषविणारे अब्दुल रहीम राथेर यांची जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
- सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर जावेद अहमद दार यांनी अध्यक्षपदाच्या नावासाठी राथेर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर त्याला नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार रामबन व अर्जुनसिंह राजू यांनी पाठिंबा दिला.
- जम्मू-काश्मीरमधील विरोधी पक्षांनी या निवडणुकीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने हंगामी अध्यक्ष मुबारक गुल यांनी आवाजी मतदान घेत राथेर यांची निवड केली.
- या आधीचा ‘युद्ध अभ्यास 2024’ हा सराव सप्टेंबर 2024 मध्ये राजस्थानात आयोजित करण्यात आला होता.
सरावाचे उद्दिष्ट
- परस्पर सहकार्याने केले जाणारे कार्य, संयुक्तता आणि विशेष मोहिमांच्या रणनीतींची परस्पर देवाणघेवाण वाढवून भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देणे हे वज्र प्रहार या सरावाचे उद्दिष्ट आहे.
- या सरावामुळे वाळवंटी आणि अर्ध वाळवंटी वातावरणात संयुक्त विशेष दलाच्या मोहीमा राबविण्याची एकत्रित क्षमता वाढेल.
- उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन आणि संयुक्त रणनीतिक अभ्यास यावर या सरावात भर दिला जाईल.
- वज्र प्रहार हा सराव दोन्ही देशांना संयुक्त विशेष दलाच्या मोहीमांच्या संचालनासाठी आपल्या सर्वोत्तम पद्धती आणि अनुभव सामायिक करण्यास सक्षम बनवेल.
- या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमधील आंतर-कार्यक्षमता, सद्भाव आणि सौहार्द वाढवण्यास मदत होईल.
अर्थशास्त्रज्ञ विवेक देबरॉय यांचे निधन
- प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.
- देबरॉय सप्टेंबर 2017 पासून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष होते.
- 2015 मध्ये त्यांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आला होते.
- अनेक वृत्तपत्रात त्यांनी लेखन केले.
- ‘रामकृष्ण मिशन स्कूल’ मध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
- कोलकाता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि केंब्रिज येथील त्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात प्रावीण्य मिळविले.
- देबरॉय यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज, पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड येथे काम केले आहे. तसेच, अर्थ मंत्रालयातील कायदेविषयक सुधारणा प्रकल्पाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले.
- ते नीती आयोगाचे 2015 ते 2019 या काळात पूर्ण वेळ सदस्य होते.