- राष्ट्रीय जल अभियान, जल शक्ती मंत्रालयाच्या जलस्रोत नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग,यांच्या वतीने केंद्रीय मध्यवर्ती अधिकारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी ‘जल शक्ती अभियान – पावसाचे पाणी साठवा 2024’ उपक्रमाबाबत कार्यशाळा व अभिमुख कार्यक्रमाचे 25 जून 2024 रोजी नवी दिल्लीत आयोजन करण्यात आले होते.
- अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी हे अधिकारी 151 जिल्ह्यांना भेट देणार आहेत.
- या कार्यक्रमाला केंद्रीय जल शक्ती मंत्री सी.आर. पाटील आणि जल शक्ती राज्यमंत्री डॉ. राज भूषण चौधरी उपस्थित होते.
- केंद्रीय मध्यवर्ती अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी असे पथक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांचा दोन वेळा दौरा करेल.
- या दौऱ्यादरम्यान पथकाची भूमिका आणि जबाबदाऱ्या अधोरेखित करण्याचा कार्यशाळेचा उद्देश होता.
- ‘जल शक्ती अभियान – पावसाचे पाणी साठवा 2024’ उपक्रम 9 मार्च 2024 ते 30 नोव्हेंबर2024 या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागांतील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे.
जल संवर्धनात महिलांच्या भूमिकेचे महत्त्व सांगणारी ‘नारी शक्ती द्वारे जल शक्ती’ अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.