- दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जाणारा जागतिक आरोग्य दिन हा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आपल्या भागीदारांच्या सहकार्याने पुढाकार घेतलेला एक जागतिक उपक्रम आहे.
- दरवर्षी 7 एप्रिलला जगभरात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात 1950 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली होती.
- सन 1948 साली 7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव मांडण्यात आला.
- त्यानंतर 1950 पासून हा दिवस साजरा केला जातो.
- 2025 या वर्षी जगभरात 74 वा जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला.
- दरवर्षी डब्ल्यूएचओ जागतिक आरोग्य दिनासाठी एक विशिष्ट थीम जाहीर करते जेणेकरून चिंतेचे एक महत्त्वाचे क्षेत्र अधोरेखित होईल.
- 2025 ची थीम “निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य” (healthy beginnings hopeful futures)आहे.
- 7 एप्रिल 2025 रोजी साजरा होणारा जागतिक आरोग्य दिन, माता आणि नवजात शिशुंच्या आरोग्यावरील वर्षभर चालणाऱ्या मोहिमेला सुरुवात करेल.
- निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य या शीर्षकाची ही मोहीम सरकार आणि आरोग्य समुदायाला प्रतिबंधित माता आणि नवजात शिशु मृत्यू थांबविण्यासाठी प्रयत्न वाढविण्यासाठी आणि महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देण्यास उद्युक्त करेल.
जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?
- मानवी आरोग्याच्या दृष्टीने त्याविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात.
- शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष असणं गरजेचे आहे त्यामुळे जागतिक आरोग्य दिनाचे विशेष महत्त्व आहे.
- WHO देखील जागतिक स्तरावर भेडसावणार्या आरोग्य विषयक समस्यांना या दिवसाचं औचित्य साधत काही उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो.



