- दोन दिवसीय जागतिक इंडिया एआय शिखर परिषद 2024चा नवी दिल्लीत भारत मंडपममध्ये प्रारंभ झाला.
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, जपानचे गृह आणि दळणवळण खात्याचे उपमंत्री हिरोशी योशिदा, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद, सचिव एस कृष्णन, नॅसकॉमच्या अध्यक्ष देबजानी घोष, ओपनएआयचे उपाध्यक्ष श्रीनिवास नारायणन् आणि मेतीचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.