- महाराष्ट्रातील सातारा येथील शेरेवाडे येथे वास्तव्य करणाऱ्या सोळा(16) वर्षीय अदिती गोपीचंद स्वामी जागतिक तिरंदाजी स्पर्धेत (स्टेज थ्री) विश्वविक्रमाची नोंद केली.
- अदीतिने कोलंबियांमधील मेडलीन येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील महिला कंपाऊंड पात्रता फेरीत 18 वर्षाखालील विक्रम मोडीत काढला.
- अदितीने अमेरिकेच्या लिको अरीओला हिचा विक्रम मागे टाकत भारतासाठी दैदिप्यमान कामगिरी केली.
- अदितीने पात्रता फेरीच्या लढतीत 720 पैकी 711 गुणांची कमाई केली.अमेरिकेच्या लिको हिने 720 पैकी 705 गुणांची कमाई करीत विक्रम प्रस्थापित केला होता
- अदिती स्वामी ही मूळची साताऱ्याची. इयत्ता सहावी पासून तिने तिरंदाजी खेळाकडे आपली पावले वळवली. आता ती बारावीचे शिक्षण घेत असून सायन्स मधून पुढील शिक्षण पूर्ण करीत आहे.
- दृष्टी तिरंदाजी अकादमीत या खेळाचा सराव केला.
- प्रवीण सावंत या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अदितीने तिरंदाजीचे कसब आत्मसात केले.
- 16 वर्षीय अदितीने डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या एशिया कप लेग- 3 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.


