Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जागतिक भूक निर्देशांक – 2023

  • कन्सर्न वर्ल्डवाइड ऑफ आयर्लंड आणि वेल्थयुन्गेरिल्फ या दोन संस्था मिळून दरवर्षी जागतिक भूक निर्देशांक अहवाल प्रसिद्ध करीत असतात.
  • एखाद्या देशातील अन्नधान्याची उपलब्धता, पोषण-कुपोषण स्थिती इ. निकषांच्या आधारे नोंदवली जाणारा सन 2023 साठीचा जागतिक भूक निर्देशांक अहवाल जाहीर झाला असून, 125 देशांच्या यादीत भारताने 111 वे  स्थान मिळवले आहे.
  • 2022 या वर्षी 121 देशांच्या यादीत भारताचे स्थान 107 वे होते.
  • जागतिक भूक निर्देशांक हे जागतिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भुकेची पातळी मोजण्याचे सर्वसमावेशक साधन आहे.
  • भारताने यावर्षी या निर्देशांकात 28.7 गुण मिळविले असून त्यातून देशातील भुकेची परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे.
  • निर्देशांकाच्या बाबतीत भारताच्या शेजारी देशांची कामगिरी ही भारतापेक्षा चांगली आहे.
  • यात पाकिस्तान 102, बांगलादेश 81, नेपाळ 69 आणि श्रीलंका 60व्या स्थानावर आहे.
  • जगातील दक्षिण आशिया आणि दक्षिण आफ्रिका तसेच सहारा या प्रदेशात भूकेचे संकट सर्वाधिक तीव्र आहे .
  • या प्रदेशांचा भूक निर्देशांक 27 असून तो भुकेचा गांभीर्य दर्शवितो.
  • 2023 च्या या अहवालानुसार बेलारूस, बोसनिया, हरझेगोविना, चिली, चीन हे सर्वोच्च क्रमवारी असलेल्या देशांत आहेत(म्हणजे भुक कमी पातळी) आणि येमेन , मादागास्कर, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक सर्वात खाली आहेत.
  • या अहवालानुसार भारतात बालकांच्या कुपोषणाची स्थितीही वाईट असून बालकांमधील भूक निर्देशांक 18.7 असून बालकांमधील कुपोषणाची स्थिती किती गंभीर आहे हे दिसते.

कुपोषणात वाढ:-

  • जागतिक भूक निर्देशांक यंदा 18.3 असून तो मध्यम तीव्रतेचा समजला जातो .
  • तो 2015 मधील 19.1 अंशाच्या तुलनेत तो एक अंशाने कमी आहे.
  • 2017 पासून भूक निर्देशांक मोजण्यासाठी कुपोषणाचाही समावेश करण्यात आला.
  • जगभरातील कुपोषित व्यक्तींची संख्या 57.2 कोटीहून 73.5 कोटींवर केली आहे.

मोजमापाचे निष्कर्ष काय?

प्रत्येक देशातील कुपोषितांचे प्रमाण, पाच वर्षांवरील मुलांमधील कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण, पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण असे काही निकष भूक निर्देशांक मोजताना वापरले जातात.

जागतिक भूक निर्देशांक (GHI – ग्लोबल हंगर इंडेक्स)

ग्लोबल हंगर इंडेक्स ( GHI ) हे एक साधन आहे जे जागतिक स्तरावर तसेच प्रदेशानुसार आणि देशानुसार भूक मोजण्याचा आणि मागोवा घेण्याचा प्रयत्न करते, जे युरोपियन एनजीओ ऑफ कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थंगरहिल्फ यांनी तयार केले आहे .

GHI ची गणना दरवर्षी केली जाते आणि त्याचे परिणाम दरवर्षी ऑक्टोबरमध्ये जारी केलेल्या अहवालात दिसून येतात.

पार्श्वभूमी:-

  • 2006 ह्या वर्षी GHI ला सुरवात झाली.
  • सुरवातीला यूएस आधारित- इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट (IFPRI) आणि जर्मन आधारित वेल्थहंगरहील्फ  द्वारे प्रकाशित केले गेले.
  • 2007 या वर्षी आयरिश एनजीओ कन्सर्न वर्ल्डवाइड देखील सह प्रकाशक बनले.
  • 2018 ह्या वर्षी IFPRI ने प्रकल्पातून माघार घेतली आणि GHI हा वेल्थहंगरहील्फ आणि कन्सर्न वर्ल्डवाईडचा संयुक्त प्रकल्प बनला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *