रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचार कंपनी जिओ 2024 मधील देशातील सर्वांत अव्वल बँड ठरला आहे.
बँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500’ अहवालानुसार जिओने भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या कंपन्यांना मागे टाकले आहे.
अधिक माहिती
● जगातील सर्वांत उत्तम ब्रँडच्या यादीत जिओ 17 व्या स्थानावर आहे. कंपनीचा ब्रँड निर्देशांक 88.9 आहे.
● ‘ग्लोबल-500’च्या सर्वोत्तम बँडच्या यादीत वुईचॅट, यूट्यूब, गूगल, डेलॉइट, कोका-कोला आणि नेटफ्लिक्स अव्वल स्थानी आहेत.
● या यादीत एलआयसी जागतिक स्तरावर 23 व्या क्रमांकावर आहे. तर भारतातील सर्वांत मोठी सरकारी बँक स्टेट बँक 24 व्या स्थानावर आहे.
● या दोन्ही भारतीय बँडने इन्स्टाग्रामला मागे टाकले आहे.
● या अहवालानुसार, वुई चॅट, यूट्यूब, गूगल, हॉटेल बँड मरिना बे, रोलेक्स, बँक ऑफ चायना, स्विसकॉम, आदी अनेक मोठे बँड 25 अव्वल ब्रँडच्या यादीत आहेत.
● जिओच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली असून, ती 6.1 अब्ज डॉलर झाली आहे. त्याला ‘एएए ‘ ब्रँड मानांकन देण्यात आले आहे.


