Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जेफ बेझोस सर्वांत श्रीमंत व्यक्ती

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी एलॉन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपतीचे स्थान पटकावले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीनुसार, अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिल्या स्थानावर आहेत.

अधिक माहिती
• जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती आता 200 अब्ज डॉलर (16.58 लाख कोटी रुपये) आहे.
• तर एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 198 अब्ज डॉलर (16.41 लाख कोटी रुपये) आहे.
• लुई व्हिटॉन मोएट हेनेसीचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट 197 अब्ज डॉलर (16.33 लाख कोटी रुपये) संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
• टेस्लाच्या शेअरमधील घसरणीमुळे मस्क यांची एकूण संपत्ती कमी झाली आहे.
• या यादीत मार्क झुकेरबर्ग चौथ्या क्रमांकावर आणि मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स पाचव्या स्थानावर आहेत.
• स्टीव्ह बाल्मर सहाव्या, वॉरेन बफे सातव्या आणि लॅरी एलिसन आठव्या क्रमांकावर आहेत.
• लॅरी पेज नवव्या, तर सर्जी ब्रेन दहाव्या क्रमांकावर आहेत.

मुकेश अंबानी 11 व्या स्थानावर
• या यादीतील पहिल्या दहामध्ये भारतातील एकाही अब्जाधीशाचा समावेश नाही.
• रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 9.53 लाख कोटी रुपये संपत्तीसह 11व्या स्थानावर आहेत, तर गौतम अदानी या यादीत 12व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 8.62 लाख कोटी रुपये आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *