Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जेष्ठ अभिनेत्री बी. सरोजदेवी यांचे निधन Veteran actress B. Sarojdevi passes away

Veteran actress B. Sarojdevi passes away

● कन्नड चित्रपटसृष्टीच्या पहिल्या महिला सुपरस्टार आणि तमिळ चित्रपटसृष्टीच्या अभिनय सरस्वती अशी मानाची बिरुदे मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजादेवी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले .
● बंगळूरुमधील मल्लेश्वरम येथील राहत्या घरी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे त्यांचे निधन झाले.
● त्यांच्या निधनामुळे कन्नड आणि तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
● बी सरोजादेवी यांना तमिळमध्ये प्रेमाने ‘कन्नडातु पैंगिली’ (कन्नड पोपट) म्हणून संबोधले जाई.
● त्यांनी 1955 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी होनप्पा भागवतार या सहकलाकाराबरोबर ‘महाकवी कालिदास’ या कन्नड चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
● त्यापाठोपाठ १९५८मध्ये तमिळनाडूचे लोकप्रिय अभिनेते आणि माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांच्याबरोबर त्यांनी ‘नदोदी मन्नन’ हा तमिळ चित्रपट केला.
● त्यानंतर त्यांची गणना तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होऊ लागली.
● या जोडीने एकूण 48 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
● त्यांचा १९६६ सालचा ‘अन्बे वा’ हा तमिळ चित्रपट अजूनही लोकप्रिय आहे.
● कन्नड आणि तमिळबरोबरच त्यांनी तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले.
● शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, डॉ. राजकुमार आणि एन टी रामा राव यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर त्या समर्थपणे पडद्यावर वावरल्या.
● दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांच्याबरोबरचा ‘पैगाम’ (१९५९), राजेंद्रकुमार यांच्याबरोबर ‘ससुराल’ (१९६१), सुनील दत्त यांचा ‘बेटी बेटे’ (१९६४) आणि शम्मी कपूर यांच्याबरोबर ‘प्यार किया तो डरना क्या’ (१९६३) या हिंदी चित्रपटांमध्ये
● बी सरोजादेवी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.
● सुरिया आणि नयनतारा यांची भूमिका असलेला २००९चा ‘आधवन’ या तमिळ चित्रपटात त्या अखेरच्या दिसल्या.

सन्मान:

1)पद्मश्री (1969)
2)पद्मभूषण (1992)
3) जीवनगौरव पुरस्कार (2008)
4) तमिळनाडू सरकारचा कलैममानी जीवनगौरव पुरस्कार (2009)

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *