मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चरित्र कलाकारांपैकी लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. मागील काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. 300 हून अधिक मराठी चित्रपटातून त्यांनी काम केले.
• मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे रवींद्र बेर्डे यांचे सख्खे बंधू.
• रवींद्र बर्डे यांनी 31 नाटकांमधून भूमिका केल्या आहेत.
• 1987 मध्ये त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती.
• 1995 यावर्षी व्यक्ती आणि वल्ली नाटक करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
• होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, थरथराट, चंगू मंगू, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, अशा कित्येक चित्रपटातून त्यांनी काम केले.
● हिंदीत सिंघम चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती.