हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत सोज्वळ आणि सालस भूमिका सहजरीत्या साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अर्थात सुलोचना दिदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.
मूर्तिमंत सोज्वळता, लोभस चेहरा, बोलके डोळे आणि वागण्या बोलण्यातील शालिनीता या जोरावर एक सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व म्हणून सुलोचना दिली पडद्यावर लोकप्रिय ठरल्या
अल्पपरिचय:
जन्म : – 30 जुलै 1928 बेळगाव
पहिला चित्रपट :1943 मध्ये चिमुकला संसार या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली
सुलोचनादीदी यांचे काही गाजलेले चित्रपट:
मराठी चित्रपट :-
मीठ भाकर ,जय भवानी, जीवाचा सखा, बाळा जो जो रे ,स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, चिमणी पाखरे, मराठा तितुका मिळवावा, महाराणी येसूबाई ,वहिनीच्या बांगड्या , सांगते ऐका, प्रपंच, साधी माणसं ,मोलकरीण, महात्मा ज्योतिबा फुले, मी तुळस तुझ्या अंगणी, धाकटी जाऊ, विठू माझा लेकुरवाळा, माझं घर माझी माणसं, एकटी, सतीची पुण्याई, घरची राणी, लक्ष्मीची पावले
हिंदी चित्रपट :
सुजाता, झुला ,संघर्ष ,मेहेरबान ,रेश्मा और शेरा, नई रोशनी, मेरा घर मेरे बच्चे, अब दिल्ली दूर नही, सती अनुसया, आई मिलन की बेला, दुनिया ,आदमी, जॉनी मेरा नाम, साजन, मजबूर, कसोटी, क्रांती ,क्रोधी, गुलामी सरस्वतीचंद्र, हिम्मतवाला, प्रेम नगर, कोरा कागज, अंधा कानून, मुकद्दर का सिकंदर, कटी पतंग, रामपूर का लक्ष्मण ,हिरा,
गंगा की सौगंध
सुलोचना दीदी यांना मिळालेले महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कार
1955 :राष्ट्रीय पुरस्कार रौप्य पदक
2)1956 :राष्ट्रीय पुरस्कार रौप्य पदक
3)1559: राष्ट्रीय पुरस्कार रौप्य पदक
4)1965: विशेष गुणवत्ता पुरस्कार
5)1970: राष्ट्रीय पुरस्कार रौप्य पदक
6)1999: पद्मश्री पुरस्कार
राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार:
1962-1963:सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार
1967-1968 : विशेष अभिनेत्री पुरस्कार
महाराष्ट्र भूषण
2009 मध्ये सुलोचनादिदी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
इतर महत्वाचे पुरस्कार:
2000 – कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी पुरस्कार
2001 – हृदयश आर्टस् चित्रमाऊली पुरस्कार
2001 – महाराष्ट्र टाईम्स महाराष्ट्र भूषण पुरस्कार
2002 – सह्याद्री वाहिनी नवरत्न पुरस्कार
2003 – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ: चित्रभूषण पुरस्कार
2004 – फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार



