ज्येष्ठ विधिज्ञ इक्बाल छागला यांचे निधन
- देशातीलआघाडीच्या वकिलांपैकी एक,बॉम्बे बार असोसिएशनचे (बीबीए) प्रमुख सदस्य असलेले ज्येष्ठ विधिज्ञ इक्बाल छागला यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
- स्वतंत्र्योत्तरभारतातील मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती एम.सी. छागला यांचे ते पुत्र आणि सध्या उच्च न्यायालयात कार्यरत असलेले न्यायमूर्ती रियाज छागला यांचे ते वडील होत.
- 1939 मध्येजन्मलेल्या छागला यांनी केंब्रिज विद्यापीठातून इतिहास आणि कायदा या विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली.
- 1970 मध्येत्यांना बॉम्बे बार असोसिएशनमध्ये पाचारण करण्यात आले आणि पुढे 1979 मध्ये त्यांना वरिष्ठ वकिलाचा दर्जा देण्यात आला.
- छागलायांनी तीनवेळा बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले.
- याशिवाय, त्यांनीबार असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि दिल्ली येथील राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे (एनएलएसए) सदस्य म्हणूनही काम केले होते.



