Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

टाटा मेमोरियल केंद्राच्या न्यूरोसर्जरी विभागाने खरेदी केली देशातील पहिली अत्याधुनिक इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड इमेजिंग यंत्रणा

  • Home
  • Current Affairs
  • टाटा मेमोरियल केंद्राच्या न्यूरोसर्जरी विभागाने खरेदी केली देशातील पहिली अत्याधुनिक इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड इमेजिंग यंत्रणा
  • टाटा मेमोरियल केंद्राच्या(TMC) न्यूरोसर्जरी विभागाने अलीकडेच गुंतागुंतीच्या ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेसाठी देशातील पहिली अत्याधुनिक इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड(iUS) इमेजिंग उपकरण खरेदी केले.
  • टाटा मेमोरियल केंद्राच्या डॉ. अलीअसगर मोयादी यांच्या नेतृत्वाखालील न्यूरोसर्जरी टीमने भारतामधील इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड इमेजिंग यंत्रणा तंत्रज्ञानाचा प्रारंभ केला आहे आणि ही टीम जगभरातील अग्रणी टीमपैकी एक आहे.
  • आययूएस हे अतिशय किफायतशीर तंत्रज्ञान आहे आणि योग्य प्रशिक्षणाने एखाद्या न्यूरोसर्जनच्या भात्यातील महत्त्वाचे आयुध ठरू शकते.
  • बीकेऍक्टीव्ह मशीन ही अलीकडेच खरेदी करण्यात आलेली यंत्रणा देशातील पहिली अत्याधुनिक आययूएस प्रणाली आहे.
  • इन्ट्रिन्सिक ब्रेन ट्युमर सुरक्षितपणे आणि अचूकतेने काढून टाकण्यासाठी इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग अतिशय महत्त्वाची यंत्रणा आहे.
  • नेव्हीगेशनल मदतीसह (जी सर्जिकल जीपीएस प्रणालीप्रमाणे आहे). आययूएस यंत्र न्यूरोसर्जनना ट्यूमरचे अवशेष अचूकतेने काढण्यास मदत करते.
  • त्याबरोबरच अवेक सर्जरीसारख्या ब्रेन मॅपिंग तंत्रज्ञानाची जोड दिल्यास, मेंदूमधील अगदी जास्त महत्त्वाची कार्ये असलेल्या भागातूनही ट्यूमर मुळापासून काढून टाकता येतो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *