Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

टायगर विजय-24 मदत आणि आपत्ती निवारण संयुक्त सराव

भारत आणि ,अमेरिका या देशांदरम्यान प्रस्थापित भागीदारीला अनुसरून, या दोन्ही देशांदरम्यान 18 ते 31 मार्च 24 या कालावधीत पूर्व किनाऱ्यावर टायगर विजय-24 या द्विपक्षीय आणि तिन्ही सेनादलांचा सहभाग असलेल्या मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) या सराव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहिती
• भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग विमानांसह सुसज्ज जहाजे, भारतीय लष्कराचे सैनिक आणि वाहने तसेच भारतीय हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यासह शीघ्र कृती वैदयकीय पथक (आरएएमटी) देखील या सरावात सहभागी होणार आहे.
• अमेरिकी नौदलाच्या जहाजांवर तैनात अमेरिकी मरीन कोअरची पथके तसेच अमेरिकेच्या लष्करातील सैनिक अमेरिकेतर्फे या सरावात सहभागी होणार आहेत.

उद्देश
• एचएडीआरविषयक कारवायांच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांदरम्यान आंतरपरिचालन क्षमता विकसित करणे तसेच दोन्ही देशांच्या सेनादलांमध्ये जलद आणि विनाअडथळा समन्वय शक्य करण्यासाठी प्रमाणित परिचालन पद्धती (एसओपीज)ला अधिक उत्तम स्वरूप देणे हा या सरावाचा उद्देश आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *