Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

टेनिसपटू सिन्नेरनेवर बंदी

टेनिसपटू  सिन्नेरनेवर बंदी

  • जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थानावर असणाऱ्या यानिक सिन्नेरने जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेशी (वाडा) तडजोड करताना तीन महिन्यांची बंदी स्वीकारली आहे.
  • तीन ग्रँडस्लॅम विजेता सिन्नेर गेल्या वर्षी उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळला होता.
  • त्याच्या बंदीचा कार्यकाळ 9फेब्रुवारी ते 4 मे 2025 असा निश्चित करण्यात आला आहे.
  • ‘वाडा’कडून बंदी घालण्यात अॅनाबोलिक स्टेरॉइडचे सिन्नेरने अनावधानाने सेवन केल्याचे गेल्या वर्षी मार्चमध्ये उघडकीस आले होते.
  • या प्रकरणात सिन्नेरवर किमान एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय प्रकरणात सिन्नेरवर किमान एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय ‘वाडा’ने घेतला होता.
  • मात्र, अपघाताने त्याच्या शरीरात उत्तेजकाचा अंश सापडला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस अखंडता संस्थेने सिन्नेरवर निर्बंध लादू नयेत असा निर्णय दिला होता. या निर्णयाला ‘वाडा’ने क्रीडा लवादात आव्हान दिले होते.

वाडा (WADA)

  • वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी 140 हून अधिक राष्ट्रांच्या सरकारांनी कॅनडास्थित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसह क्रीडा क्षेत्रातील मादक पदार्थांविरुद्धच्या लढ्याचा प्रचार, समन्वय आणि देखरेख करण्यासाठी सह-स्थापित केली आहे.
  • स्थापना : 10 नोव्हेंबर 1999
  • अध्यक्ष : विटोल्ड बांका
  • मुख्यालय : मॉन्ट्रियल , क्वेबेक , कॅनडा
  • आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ, राष्ट्रीय अँटी-डोपिंग संघटना, आयओसी आणि आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीसह 650 हून अधिक क्रीडा संघटनांनी स्वीकारलेल्या जागतिक अँटी-डोपिंग कोडसाठी वाडा जबाबदार आहे .

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *