राष्ट्रीय शिक्षण दिन
- 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो.
- भारताचे प्रथम शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त हा दिवस साजरा केला जातो.
- सप्टेंबर 2008 मध्ये, भारत सरकारने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेतील योगदानाचा सन्मान करण्यासाठी 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन घोषित केला.
- आझाद हे विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्य योद्धा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.
- त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1888 रोजी झाला. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांची स्थापना केली.
- त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), साहित्य अकादमी, ललित कला अकादमी, संगीत नाटक अकादमी आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) यासह अनेक शैक्षणिक आस्थापनांची स्थापना करण्यात आली.
- त्यांनी IIT खरगपूर या पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना केली.
राष्ट्रीय शिक्षण दिन 2024: थीम
- सर्वसमावेशक, उच्च-गुणवत्तेचे शिक्षण हा विषय राष्ट्रीय शिक्षण दिन 2024 चा केंद्रबिंदू असेल.
- ही थीम उत्कृष्ट शिक्षणाला प्रोत्साहन देते, जी व्यक्तींना विकसित होत असलेल्या जगात आवश्यक असलेल्या क्षमता आणि माहितीसह सुसज्ज करते.
- शैक्षणिक यशासाठी गंभीर विचार, सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित करणे आवश्यक असेल.
मॉरीशसच्या पंतप्रधानपदी डॉ. नवीन रामगुलाम यांची निवड
- मॉरीशसमध्ये झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत डॉ.नवीन रामगुलाम यांची पंतप्रधान पदी निवड करण्यात आली.अलायन्स डू चेंजमेंटच्या युतीत त्यांनी विजय मिळवला.
- मॉरिशसचे पहिले पंतप्रधान, सीवूसागुर रामगुलाम यांचे पुत्र, नवीन रामगुलाम हे मॉरिशसमधील नेतृत्वाचा इतिहास असलेली एक प्रमुख राजकीय व्यक्ती आहे.
- त्यांच्या अलायन्स ऑफ चेंज मोहिमेने देशाच्या आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यावर लक्ष केंद्रित केले, राष्ट्रीय सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांवर लक्ष केंद्रित केले.
राजकीय प्रवास
- 1991 ते 1995 पर्यंत विरोधी पक्षनेते होते.
- डिसेंबर 1995 ते सप्टेंबर 2000 पर्यंत त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून काम केले आणि त्यानंतर ऑक्टोबर 2000 ते 4 जुलै 2005 पर्यंत ते पुन्हा विरोधी पक्षनेते बनले.
- 5 जुलै 2005 रोजी ते पंतप्रधान झाले. त्यांच्या युती, अलायन्स सोशल, सार्वत्रिक निवडणुका जिंकल्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले .
- 2005 मध्ये ते पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आले. 2014 मध्ये ते पराभूत झाले.
- राजकीय पक्ष : मजूर पक्ष
डब्ल्यूटीए स्पर्धेत कोको गॉफ विजेती
- कोको गॉफने डब्ल्यूटीए फायनल्सच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
- तिने अंतिम फेरीच्या लढतीत ऑलिंपिक पदकविजेती झेंग किनवेन हिच्यावर 3-6, 6-4, 7-6 असा तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवला आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली.
- याआधी 2014 मध्ये अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने डब्ल्यूटीए फायनल्सचे विजेतेपद पटकावले होते.
- 10 वर्षांनंतर कोको गॉफच्या रूपात अमेरिकन महिला खेळाडू विजेती ठरली.