डी. गुकेश विश्वविजेता
- भारताच्या गुकेश दोम्माराजूने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवर 14 व्या आणि शेवटच्या डावात थरारक मात केली आणि 18 व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान पटकावला.
- महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतरचा गुकेश हा दुसराच भारतीय जगज्जेता ठरला.
- सिंगापूरमध्ये झालेल्या या लढतीत 14 व्या डावामध्ये डिंग लिरेनकडे पांढरी मोहरी असूनही, गुकेश अधिक आक्रमकपणे आणि आत्मविश्वासाने खेळत होता.
- गुकेश हा काळ्या मोहऱ्यासह विजयी ठरला.
- लढतीपूर्वी आणि दरम्यान डिंग लिरेन जगज्जेता होता. तुलनेने नवखा असूनही गुकेशनेच बहुतेकदा विजयासाठी प्रयत्न केले. या लढतीतील पहिला डाव गमावूनही गुकेश विचलित झाला नाही.
- पाच वेळेचा बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंदने शेवटची जागतिक अजिंक्यपद 2012 मध्ये पटकावले त्यानंतर 12 वर्षांनी पुन्हा एकदा गुकेश च्या रूपाने भारतीय खेळाडू जगज्जेता बनला आहे.
विक्रमी यश
- बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता ठरताना गुकेशने रशियाच्या गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडीत काढला.
- कास्पारोव्हने 1985 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी अनातोली कारपोव्हला पराभूत करत जगज्जेतेपद मिळवले होते. तसेच गुकेशने भारताची 12 वर्षांपासूनची बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठीची प्रतीक्षा संपवली.
डी. गुकेश
- डी. गुकेश यांचेपूर्ण नाव डोमराजू गुकेश असून तो चेन्नईचा रहिवासी आहे.
- गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या 7 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले.
- नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत तसेच ते चेन्नईमध्ये होम चेस ट्यूटर आहेत.
- त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले.
- गुकेशचे वडील डॉक्टर असून आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.
गुकेश च्या विजयात पॅडी अप्टॉन यांचाही वाटा
- विश्वविजेतेपदाच्या या प्रवासात गुकेशने आई-वडिलांसह विश्वनाथन आनंद आणि त्याच्यासोबत असलेल्या टीमला श्रेय दिले. यात त्याने पॅडी अप्टॉन यांच्या नावाचा उल्लेख केला.
- भारतीय क्रिकेटशी ते जवळचे राहिले आहेत.
- अप्टॉन हे मूळचे दक्षिण आफ्रिकन आहेत.
- ते आफ्रिका क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते; पण मानसिक प्रशिक्षक म्हणून त्यांची फार मोठी ख्याती आहे.
- महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये मिळवलेल्या विश्वविजेत्या संघाचेही ते मानसिक प्रशिक्षक होते.
अप्टॉन आणि भारतीयांचे यश
- 2011 : भारतीय एकदिवसीय विश्वविजेता संघ
- 2024 : पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेत्या हॉकी संघासोबत
- 2024 : बुद्धिबळ विश्वविजेत्या गुकेशसोबत
- प्रशिक्षक : गायो (ग्रेझेगोर्झ गाजेवस्की)
‘सीई-20′ क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘सीई 20’ क्रोयोजेनिक इंजिनची महत्त्वाची चाचणी यशस्वीपणे पार पडली. या चाचणीद्वारे ‘रिस्टार्ट’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
- ‘इस्रो’च्या भविष्यातील मोहिमांना त्यामुळे बळ मिळणार आहे. देशी बनावटीच्या ‘सीई-20’ क्रायोजेनिक इंजिनंची निर्मिती ‘लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटर’ने केली आहे.
- हे इंजिन ‘लाँच व्हेइकल मार्क-3’चा (एलव्हीएम- 3) वरचा टप्पा यशस्वीपणे कार्यान्वित करते.
- आतापर्यंत सहा मोहिमांमध्ये वरचा टप्पा यशस्वीपणे कार्यान्वित केला गेला आहे.
- नुकत्याच झालेल्या ज्ञानगंगा मोहिमेत 20 टनांच्या पातळीसाठीही इंजिनने पात्रता सिद्ध केली होती. तसेच, 22 टनांपर्यंतच्या पातळीसाठीही सज्ज केले आहे.
- क्रायोजेनिक इंजिन ‘रिस्टार्ट’ करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची चाचणी ‘इस्रो’ने पार पाडली आहे.
‘एक देश, एक निवडणूक ‘ला मंजुरी
- देशात एकाच वेळी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- ही विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडली जाणार असून सखोल चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवली जाणार आहे.
- लोकसभा तसेच राज्य -राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जाव्यात व त्यानंतर देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे महत्त्वाची शिफारस कोविंद समितीने केली होती.
कोविंद समितीच्या शिफारशी
- देशातील निवडणुका दोन टप्प्यांमध्ये होतील. पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका होतील.
- दुसऱ्या टप्प्यामध्ये, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर 100 दिवसांमध्ये देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील.
- समितीने अहवालामध्ये 18 दुरुस्त्या सुचविले आहेत.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दुरुस्तीसाठी निम्म्या राज्यांच्या विधानसभांची मंजुरी लागेल.
संसदेत विधेयके
- ‘एक देश, एक निवडणुकी’ संदर्भात तीन – विधेयके संसदेत मांडली जाणार असून त्याद्वारे संविधानातील 5 अनुच्छेदांमध्ये दुरुस्ती केली जाईल.
- अनुच्छेद 82 मध्ये दुरुस्ती केली जाणार असून – त्याद्वारे लोकसभेच्या मतदारसंघांची फेररचना केली जाईल.
- लोकसभेच्या मतदारसंघांची संख्याही वाढेल. आगामी जनगणना झाल्यानंतर मतदारसंघाची फेररचना केली जाणार आहे.
- इतर दोन दुरुस्ती विधेयकांद्वारे लोकसभा व विधानसभांचा कार्यकाल व बरखास्ती यामध्येही बदल केले जातील.
- लोकसभा व विधानसभांचा कार्यकाल एकच असेल.
- दिल्ली, पुडुचेरी व जम्मू- काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांनाही हे बदल लागू होतील.
10 वी जागतिक आयुर्वेद परिषद
- केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत 10 व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनाचे डेहराडून येथे उद्घाटन झाले.
- आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ शेखर मांडे हे देखील यावेळी उपस्थित होते.
- या द्विवार्षिक कार्यक्रमाचे आयोजन जागतिक आयुर्वेद फाउंडेशनच्या वतीने केले जाते, जो विज्ञान भारतीचा एक उपक्रम आहे.
- या ऐतिहासिक कार्यक्रमाची यावर्षीची आवृत्ती जगभरातील आयुर्वेद अभ्यासक, संशोधक आणि उत्साही लोकांना एकत्र आणण्यासाठी सज्ज आहे.
- 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी 5500 हून अधिक भारतीय प्रतिनिधी आणि 54 देशांमधील 350 हून अधिक प्रतिनिधींनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.
- या कार्यक्रमात पूर्ण सत्रांव्यतिरिक्त 150 हून अधिक वैज्ञानिक सत्रे आणि 13 सहयोगी कार्यक्रम असतील.
- जागतिक आयुर्वेद परिषद 2024 ची मध्यवर्ती संकल्पना “डिजिटल आरोग्य : एक आयुर्वेद दृष्टीकोन,” अशी असून आयुर्वेदाला चालना देण्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात्मक क्षमतेचा शोध घेईल.
- या कार्यक्रमात आरोग्य सेवा वितरण वाढविण्यासाठी, संशोधनाला पुनर्परिभाषित करण्यासाठी आणि वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक आरोग्य परिदृश्यामध्ये आयुर्वेदाला समाकलित करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल साधने आणि अभिनव कल्पनांचा लाभ घेण्यासाठी विचारमंथन आणि माहितीची देवाणघेवाण समाविष्ट असेल.
- या कार्यक्रमात तांत्रिक सत्रे, पॅनेल चर्चा, पूर्ण आणि वैज्ञानिक सत्रे, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे संमेलन, आरोग्य मंत्र्यांचे संमेलन, गुंतवणूकदारांची बैठक आणि सॅटेलाईट सेमिनार देखील असतील.
- आधुनिक काळातील वैविध्यपूर्ण आरोग्य सेवा आव्हानांसाठी आयुर्वेदिक उपायांवरही यात चर्चा केली जाईल.