ऑस्ट्रेलियाचा तारांकित सलामीवीर डेविड वॉर्नरने कसोटी पाठोपाठ एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे.
आपले घरचे मैदान असलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर वॉर्नर या आठवड्यात पाकिस्तान विरुद्ध कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणार आहे.
अधिक माहिती
● याआधी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या भारताविरुद्धच्या विश्वचषक एकदिवसीय क्रिकेटचा सामना हा वार्नरच्या कारकिर्दीचा अखेरचा एकदिवसीय सामना ठरला होता.
● अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करीत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.
● 2023 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियातर्फे डेविड वॉर्नरने सर्वाधिक 535 धावा केल्या होत्या.
● कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा वॉर्नरने केली असली तरी टी-20 क्रिकेट तो खेळत राहणार आहे.
वार्नरची एकदिवसीय कारकीर्द
● डावखुर्या वॉर्नरने 2009 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध होबार्ट येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
● वॉर्नरने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीत 161 सामन्यात 6,932 धावा केल्या आहेत ज्यात 22 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश होता.
● एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नर हा सहाव्या स्थानी आहे.
● त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक शतकांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.


