Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचे निधन

  • Home
  • Current Affairs
  • डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचे निधन
  • स्वामीनाथन यांचे चेन्नई येथील त्यांच्या घरी 28 सप्टेंबर 2023 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले
  • (जन्म : कुंभकोणम, 7 ऑगस्ट, 1925 , मृत्यू : 28सप्टेंबर, 2023)
  • ते भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
  • त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी ‘एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केला.
  • मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म तमिळमाडूमध्ये कुंभकोणम येथे 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला.
  • त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण 1943 मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले.
  • केरळ्मधील महाराजस कॉलेजातून त्यांनी कृषिक्षेत्रातली पदवी घेतली.
  • स्वामीनाथन यांचा विवाह मीना स्वामीनाथन यांच्याशी झाला होता. हे दोघे केंब्रिजमध्ये शिकत असताना 1951 मध्ये त्यांची भेट झाली होती. ते चेन्नई, तामिळनाडू येथे राहत होते.
  • कृषिक्षेत्रात काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली.
  • 1947 साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले.
  • 1949 मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्‍त केली.
  • युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले.
  • नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी 1952 मध्ये पी‍एच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले.
  • जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे.
  • भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते.
  • त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.

स्वामिनाथन यांना मिळालेले पुरस्कार:

  • 1967 मध्ये पद्मश्री, 1972 या वर्षी पद्मभूषण आणि साल 1989 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.
  • शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी जगभरात सन्मान मिळाला होता.
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार(1971), वर्ल्ड फूड प्राईझ (1987) नेही त्यांना सन्मानीत करण्यात आले होते.
  • 2007 – मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वामिनाथन यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले.
  • 1979 – मध्ये त्यांची भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली.
  • 1965 – मध्ये चेकोस्लोव्हाक अकादमी ऑफ सायन्सेसकडून मेंडेल मेमोरियल मेडल मिळाले
  • 1999 – मध्ये युनेस्को गांधी सुवर्ण पदक
  • 1999 – शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार
  • 2000 – मध्ये फ्रँकलिन डी. रुझवेल्ट फोर फ्रीडम्स अवॉर्ड.
  • टाइम मॅगझिनने त्यांना 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांपैकी एक म्हणून गौरवले.
  • 1986 – अल्बर्ट आइनस्टाइन जागतिक विज्ञान पुरस्कार
  • 1991- पर्यावरणीय कामगिरीसाठी टायलर पुरस्कार
  • 1961 – शांती स्वरूप भटनागर पुरस्कार

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *