● जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि महाराष्ट्रातील जनसामान्यांचे ‘आकाशाशी नाते जडवणारे’ लेखक, विज्ञान प्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
● आकाशाशी जडले नाते या माहिती ग्रंथातून संपूर्ण खवल विज्ञान अत्यंत सोप्या भाषेत मराठीतून मांडण्याची किमया डॉक्टर नारळीकर यांनी केली या पुस्तकाला अमाप प्रसिद्धी मिळालीच पण त्याने अंतराळात घडणाऱ्या घडामोडी मराठी भाषकांच्या घराघरात पोहोचल्या.
अल्प परिचय:
● जन्म : 19 जुलै 1938, कोल्हापूर
● ज्ञानाचा वारसा त्यांना आई-वडिलांकडून लाभला. वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर प्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते.
● आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसीमध्येच झाले. उच्च शिक्षणासाठी
● केम्ब्रिजला जाऊन 1963 मध्ये त्यांनी पीएचडी पदवी घेतली.
● या काळात त्यांना स्मिथ पुरस्कार, अॅडम पुरस्कार मिळाला. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन पदक आणि इतर सन्मान मिळाले.
● डॉ. नारळीकर यांचा 1966मध्ये मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी विवाह झाला. त्याही गणितज्ज्ञ होत्या.
● डॉ. नारळीकर 1972मध्ये भारतात परतल्यानंतर मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) खगोलशास्त्र विभागात (1972-1989) प्रमुख म्हणून पद स्वीकारले. तेथे ‘थिऑरॉटिकल अॅस्ट्रोफिजिक्स ग्रुप’चा विस्तार झाला.
पुस्तके:
● अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, आकाशाशी जडले नाते, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, अंतराळ आणि विज्ञान, गणितातील गमतीजमती (विकिस्रोतवरील आवृत्ती), नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : जेफ्री बर्बिज), विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाने रचयिते, सूर्याचा प्रकोप आदी.
● आत्मचरित्र : चार नगरांतले माझे विश्व
मिळालेले सन्मान
● पद्मभूषण (1965)
● पद्मविभूषण (2004)
● महाराष्ट्र भूषण (2010)
● साहित्य अकादमी (2014)
● स्मिथ्स प्राइज (1962)
● अॅडम्स प्राइज (1967)
● कलिंगा प्राइज (1996)
● बरद्वान, बनारस हिंदू, रुरकी, कोलकता आणि कल्याणी विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट
● कॉस्मोलॉजी कमिशन ऑफ द इंटर नॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल यूनियन या प्रतिष्ठित संस्थेचे, लंडनच्या रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहयोगी सदस्य
● भारतातील तीन राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय सदस्य
● ‘थर्ड वर्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’चे सन्माननीय सदस्य
● जानेवारी 2021 मध्ये नाशिक येथे झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष