● ज्येष्ठ लेखिका आणि हिंदी भाषेच्या अभ्यासक डॉ.दुर्गा विश्वनाथ दीक्षित यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
● किशोरवयात सहायक प्राध्यापक म्हणून सुरुवात केलेल्या दुर्गा दीक्षित यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली.
● त्या १९६२ मध्ये इंग्रजी आणि हिंदी विषयात विद्यापीठात प्रथम आल्या होत्या.
● १९७० मध्ये त्यांनी हिंदी विषयात पीएच. डी. पूर्ण केली.
● स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी ऐक्यभारती रिसर्च इन्स्टिट्यूट आणि ऐक्यभारती प्रतिष्ठानाची स्थापना केली.
● संशोधन, प्रकाशन, परिषदांचे आयोजन, तसेच विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी कौशल्य विकासाचे अनेक अभ्यासक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविले.
● महिला सक्षमीकरणासाठी विविध शिबिरे आयोजित केली.
● महाराष्ट्र लोकसाहित्य परिषद, दलित नाट्य संमेलन आणि बहुभाषा-युवा अभिव्यक्ती वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, संयोजन त्यांनी केले.
● डॉ. दीक्षित यांनी ‘रस सिद्धान्त का सामाजिक मूल्यांकन’, ‘नाटक और नाट्यशैलियां’, ‘महाराष्ट्र का लोकधर्मी नाट्य’, ‘हिंदी रंगमंच का अलक्षित संदर्भ’ अशा पुस्तकांचे लेखन करताना अनेक पुस्तकांचा हिंदी, मराठी अनुवादही केला. समाजसेवक, लेखक, सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद त्यांनी केला होता.
● डॉ. दीक्षित यांची इटलीतील ओरिएंटल युनिव्हर्सिटी नेपल्समध्ये हिंदी अध्यापनासाठी भारत सरकारकडून नेमणूक करण्यात आली होती.
● त्या महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष होत्या.