● भारतीय ॲन्जिओप्लास्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात हृदयविकारतज्ज्ञ डॉ. मॅथ्यू सॅम्युएल कालारिकल यांचे चेन्नईच्या अपोलो रुग्णालयामध्ये
वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.
● 6 जानेवारी 1948 मध्ये केरळमध्ये जन्मलेल्या डॉ. मॅथ्यू यांनी 1986 मध्ये भारतातील पहिली अँजिओप्लास्टी यशस्वीपणे केली होती.
● त्यांनी कोट्टायम मेडिकल कॉलेजमधून पदवी संपादन केल्यानंतर, चेन्नईमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.
● ते 1995 ते 1997 दरम्यान ते आशियाई- पॅसिफिक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी सोसायटीचे अध्यक्ष होते.
● 2000 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर 1996 मध्ये त्यांना डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारही मिळाला होता.