राज्य मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने दर वर्षी नामवंत साहित्यिकास देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अधिक माहिती
● प्रकाशन संस्थेस देण्यात येणारा श्री. पु. भागवत पुरस्कार मनोविकास प्रकाशन संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.
● या पुरस्कारांसोबतच मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2023 जाहीर केले असून त्यात अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 साठी डॉ. प्रकाश परब यांची; तर मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कारासाठी डॉ. कौतिकराव ठाले पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
● यासोबतच यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय, वाङ्मय पुरस्कार सन 2022 हे राज्यातील विविध 35 साहित्यिकांना जाहीर करण्यात आल्याचे केसरकर यांनी सांगितले.
● साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकांची विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराकरिता निवड केली जाते.
विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार
● साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर) यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रदान करण्यात येतो.