घनकचरा व्यवस्थापनासाठी बुद्धिमान तंत्रज्ञान वापरणारी महाबळेश्वर ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरली आहे.पालिकेने यासाठी शहरातील सर्व आस्थापनांचा डिजिटल सर्वे केला आहे
मागच्या काही वर्षांपासून महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या हिलदारी अभियानांतर्गत स्त्री मुक्ती संघटना व घनकचरा व्यवस्थापन बुद्धिमान तंत्रज्ञान नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने महाबळेश्वर व आसपासच्या गावांमध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.यामध्ये स्थानिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत नाविन्यपूर्ण माध्यमातून जनजागृती करणे, सफाई मित्रांसाठी विविध प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबिर, सुरक्षा साधनांचे वाटप, स्वच्छता मोहीम व शहरातील विविध भागधारकांना सदर उपक्रमात सहभागी करून घेणे इत्यादींचा समावेश आहे .
21 वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे हे लक्षात घेऊन घनकचरा व्यवस्थापन बुद्धिमान तंत्रज्ञानाच्या सहकार्याने नगरपालिकेने शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली. सध्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासक व मुख्यअधिकारी पल्लवी पाटील या आहेत.घनकचरा व्यवस्थापनासाठी यशस्वीपणे उपयोगात आणणारी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे


