तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन
- राज्यसरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व मराठी संमेलन पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत होणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली.
- संमेलनाच्याउद्घाटनप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
- मराठीलाअभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच विश्व मराठी संमेलन आहे.
- यापूर्वीचीदोन संमेलने अनुक्रमे मुंबई आणि नवी मुंबई येथे झाली होती.
- आंतरराष्ट्रीयदर्जाचे लिखाण केलेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकाचा आणि मराठी भाषेत कार्य करून आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या एका तरुणाचा सन्मान करण्याच्या उपक्रमाची या संमेलनापासून सुरवात होत आहे.
- याअंतर्गतयावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक आणि अभिनेते रितेश देशमुख यांचा गौरव करण्यात येईल. संमेलनात तरुण केंद्रस्थानी असतील.
नीरज चोप्राची सर्वोत्तम भालाफेकपट्टू म्हणून निवड
- टोकियोऑलिंपिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
- अमेरिकेतील’ट्रॅक अँड फिल्ड’ या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅगझीनकडून नीरज चोप्रा याची 2024 मधील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
- कॅलिफोर्नियायेथून प्रसिद्ध होत असलेल्या या मॅगझीनमध्ये नीरज चोप्रा याला पहिले स्थान देण्यात आले आहे.
- दोनवेळचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
- 1948 पासूनसुरू असलेल्या या मॅगझीनला क्रीडा क्षेत्रातील बायबल म्हणून ओळखण्यात येते.
- यामॅगझीनकडून दरवर्षी जागतिक आणि अमेरिकेतील खेळाडूंची क्रमवारी जाहीर करण्यात येते.
डॉ. जॉन कुरियन यांचे निधन
- देशाच्याप्राथमिक शिक्षण धोरणावर आणि पद्धतींवर प्रभाव टाकणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जॉन कुरियन यांचे नुकतेच निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
- डॉ. कुरियनयांनी 1984 मध्ये पुण्यात सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेसची (सीएलआर) स्थापना केली.
- त्यांनीअनेक पंचवार्षिक योजना, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, सर्व शिक्षा अभियान आणि शिक्षणहक्क कायदा आदींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
- बालहक्कांसाठी, बालमजुरीविरोधातीलमोहिमांमध्येही त्यांचा सहभाग होता.
- डॉ. कुरियनयांनी 1976 मध्ये विस्कॉन्सिन विद्यापीठातून शिक्षण धोरण अभ्यासात डॉक्टरेट मिळवल्यानंतर ते आणि त्यांची पत्नी झाकिया कुरियन भारतात परतले.
लेबनॉनच्या अध्यक्षपदी जोसेफ औन यांची निवड
- लेबनॉनच्यासंसदेने लष्करप्रमुख जोसेफ औन यांची देशाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड केली.
- यानिवडीमुळे प्रदीर्घ काळापासूनचा राजकीय पेच संपुष्टात आला आहे.
- लेबनॉनच्याइतिहासातील ते पाचवे लष्करी कमांडर आहेत जे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत
- बेरूतजवळीलसिन अल-फिल येथे जन्मलेले, औन गृहयुद्धादरम्यान 1983 मध्ये लेबनीज सशस्त्र दलात (LAF) सामील झाले.
- त्यांनी1985 मध्ये आर्मी रेंजर्समध्ये प्लाटून कमांडर म्हणून सुरुवात केली आणि युनायटेड स्टेट्समध्ये इन्फंट्री ऑफिसर कोर्सचे प्रशिक्षण घेतले.
- 2017 मध्येसैन्य कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यापासून, त्यांनी लेबनॉनच्या आर्थिक संकटासह महत्त्वपूर्ण आव्हानांमधून LAF चे नेतृत्व केले आहे, ज्याचा सैनिकांच्या पगारावर गंभीर परिणाम झाला.
- 2017 मध्ये, त्यांच्यानेतृत्वाखाली, लष्कराने इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांना सीरियाच्या सीमेवरून हटवण्यासाठी एक आक्रमण सुरू केले, ज्याने त्यांच्या “उत्कृष्ट कामासाठी” अमेरिकन राजदूताकडून कौतुक केले.