थायलंडमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने 27 मार्च रोजी विवाह समानता विधेयक बहुमताने मंजूर केले. 415 पैकी 400 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले.
अधिक माहिती
• हा कायदा लागू झाल्यास थायलंड हा आग्नेय आशियातील पहिला आणि तैवान आणि नेपाळनंतर आशियातील तिसरा देश असेल.
• या ऐतिहासिक विधेयकाला थायलंडमधील सर्व प्रमुख पक्षांनी पाठिंबा दिला आणि मसुदा तयार करण्यासाठी एक दशकाहून अधिक काळ लागला.
• हा कायदा 120 दिवसांनंतर लागू होईल. या कायद्यात विवाहाला पुरुष आणि स्त्रीमधील नात्याऐवजी दोन व्यक्तींमधील नाते मानण्यात आले आहे.
• जोडप्यांना विवाह पश्चात मिळणाऱ्या करबचतीची सुविधा, मालमत्तेचा वारसा हक्क, हॉस्पिटलमध्ये उपचार करताना जोडीदाराच्या उपचारासाठी द्यावी लागणारी परवानगी यासारखे अधिकार मिळणार आहेत.