पराक्रम दिन
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिन (23 जानेवारी) पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो
- पराक्रम दिवस साजरा करण्याचा उद्देश नेताजींचे विचार आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे आहे.
- हा दिवस आपल्याला आपल्या देशाची सेवा करण्यासाठी शक्य ते सर्व करण्याची प्रेरणा देतो.
- सुरवात: 2021 मध्ये, भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
- नेताजींचे जीवन आणि त्यांची शिकवण जनतेपर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे.
- हा दिवस प्रत्येक भारतीयाला त्यांच्या देशाप्रती असलेल्या कर्तव्यांची आणि समर्पणाची आठवण करून देतो.
- 2025 मध्ये, पराक्रम दिवसाची थीम “नेताजी: धैर्य, दृढनिश्चय आणि देशभक्ती”
दावोसमध्ये 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) इतिहास घडला असून महाराष्ट्राने दोन दिवसात70 लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.
- या गुंतवणुकीतून95 लाख रोजगारनिर्मिती होईल.
- दावोस येथे सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा ठरला.
- पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, फेरवापरयोग्य ऊर्जा, बायो एनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात ते 3 लाख 5 हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक करणार आहेत.
प्रजासत्ताक दिनाची संकल्पना : ‘आत्मनिर्भर नौसेनेतून राष्ट्रनिर्माण‘
- नौदलात नव्याने दाखल झालेल्या ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौका आणि ‘आयएनएस वागशीर’ पाणबुडी नौदलाच्या रथामध्ये येत्या प्रजासत्ताक दिनी दाखविली जाणार आहे.
- कर्तव्य पथावरील संचलनात नौदल आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करणार आहे.
- ‘आत्मनिर्भर नौसेनेतून राष्ट्रनिर्माण’ ही नौदलाच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी आघाडीच्या तीन लढाऊ जहाजांचे लोकार्पण झाले होते.
‘मिशन आपुलकी‘
- अहिल्यानगर जिल्हा परिषदेने ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत लोकसहभागातून राबवलेल्या मोहिमेत दोन वर्षात तब्बल 54 कोटी 50 लाख रुपयांचे साहित्य उपलब्ध झाले.
- यामध्ये शाळेत आहार शिजवणाऱ्या महिलेच्या मदतीपासून थेट ‘इन्फोसिस’ कंपनीच्या निधीतून शालेय साहित्यापासून ते टॅब, शुद्ध पाण्याच्या योजना, शाळांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.
- या मोहिमेचा तब्बल दीड हजारहून अधिक शाळांना लाभ झाला आहे.
- अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 3,560 प्राथमिक शाळा आहेत.
- 2022 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी संभाजी लांगोरे व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी लोकसहभागातून शाळांच्या विकासाची संकल्पना सुरू केली.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘योजनेला दहा वर्षे पूर्ण
- ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ मोहिमेच्या दशकपूर्तीनिमित्त 23 जानेवारीपासून जागतिक महिला दिनापर्यंत (८ मार्च) या मोहिमेच्या सर्व पैलूंबाबत जनजागृती अभियान राबविण्याची घोषणा महिला व बालकल्याण विकासमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 जानेवारी 2015 रोजी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमेचा प्रारंभ केला होता.
- या मोहिमेला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कामगिरीचा आढावा आणि भविष्यातील कामगिरीचा आढावा यासाठी मंथन झाले.
योजनेविषयी…
- 22 जानेवारी 2015 मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेची सुरवात
- 2014 -24 ला प्रतिहजार पुरुषांमागे 918 महिला असलेले लिंग गुणोत्तर 933 महिला असे झाले
- शिक्षणामध्ये मुलींच्या नोंदणीत 75 टक्क्यांवरून 79 टक्के अशी वाढ झाली
- संस्थात्मक प्रसुती 61 टक्क्यांवरून 97 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण घटले
स्वच्छ बस स्थानकाला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार
- दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ मोहीम राबवण्यात येणार आहे.
- यामध्ये तब्बल तीन कोटी रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत.
- ‘अ’ वर्गात प्रथम येणाऱ्या एसटी स्थानकाला एक कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
- ‘अ’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या एसटीचा स्थानकाला 1 कोटी रुपये, ‘ब ‘वर्ग गटातून पहिला येणाऱ्या एसटी स्थानकाला 50 लाख रुपये तर ‘क’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या एसटी स्थानकाला 25 लाख रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत.
- मोहिमेची संकल्पना: ‘ आपलं गाव -आपलं बसस्थानक’
‘भारतपर्व‘ मध्ये मधाचे गाव चित्ररथाचा समावेश
- दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 26 ते 29 जानेवारी या काळात होणाऱ्या भारतपर्व महोत्सवात ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश असेल.
- 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश झाला नाही. मात्र, त्यानंतर होणाऱ्या भारतपर्व महोत्सवात राज्याला स्थान मिळाले आहे .
- केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त ‘भारतपर्व’ महोत्सवाचे आयोजन केले जाते .
- यावर्षी महाराष्ट्रसह 12 राज्यातील चित्ररथ या महोत्सवात असणार आहेत.
- यावर्षी चित्ररथांसाठी ‘सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे.
- ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवरील राज्याच्या चित्ररथात पुढील बाबी असतील.
- पुढच्या भागात फुलांनी सजवेलेले मधमाशीचे शिल्प असेल.
- या मधमाशीभोवती लहान मधमाशा आणि काही फुले दाखवली आहेत.
- मागील भागात मधमाशांचे पोळे व राज्याच्या मध उत्पादन व्यवसायातील महत्त्वपूर्ण टप्पे दर्शविले आहेत.