दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलन परिसराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
- दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे 21 ते 23 फेब्रुवारी या दरम्यान 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
- या संमेलनाच्या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगर असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संमेलनाला येणाऱ्या साहित्यप्रेमींनी 15 जानेवारीपूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- दिल्लीत 1954मध्ये मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर 71 वर्षांनी दिल्लीत साहित्य संमेलन होणार आहे.
- याआधीच संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार असणार आहेत.
‘डीआरडीओ‘ला‘ ‘ग्रीन प्रॉपल्शन‘ तंत्रज्ञान हस्तांतरित
- मुंबईस्थित ‘मनस्तू स्पेस टेक्नॉलॉजीज’ या नवउद्यमीने संरक्षण, संशोधन व विकास संस्थेला (डीआरडीओ) अवकाशात उपग्रह इच्छित कक्षेमध्ये ठेवण्यासाठी आवश्यक असलेले ‘ग्रीन प्रॉपल्शन’ तंत्रज्ञान हस्तांतरित केले.
- ‘मनस्तू’चे संस्थापक तुषार जाधव आणि अष्तेश कुमार यांनी ‘आयबूस्टर ग्रीन प्रॉपल्शन सिस्टीम’ ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष सतीश कामत यांच्याकडे हस्तांतरित केली.
- ही यंत्रणा प्रामुख्याने 100 ते 500किलो उपग्रहासाठी विकसित करण्यात आली आहे.
- अवकाशात उपग्रह योग्य कक्षेमध्ये ठेवण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होतो.
- या तंत्रज्ञानाची अवकाशात येत्या मोहिमेत चाचणी घेण्यात येणार आहे.
- ‘डीआरडीओ’च्या अवकाश मोहिमांसाठी अतिशय परिणामकारक आणि विश्वासार्ह असे हे तंत्रज्ञान असल्याचे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या तंत्रज्ञानासाठी चार वर्षे संशोधन करण्यात आले.